Latest

‘या’ चुका टाळल्या तर तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपणार नाही…

backup backup

आजच्या काळात स्मार्टफोनचे महत्व फार वाढले आहे. स्मार्टफोन मधील अनेक अॅप्स आपल्या कामी येतात. पण स्मार्टफोन मधील या फिचर्सचा सतत वापर आपण आपण करतो आणि मोबाईलची बॅटरी संपते. स्मार्टफोन मध्ये जितके चांगले अॅप असतील तितक्याच गतीने बॅटरी उतरते. तंत्रज्ञाच्या प्रगतीने स्क्रिन डिस्प्ले, फास्ट इंटरनेट सेवांचा वापर होऊ लागला. यामुळे स्मार्टफोनच्या चार्जिंगवर मोठा परिणाम होतो. जर तुम्हीही स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअपमुळे त्रस्त असाल तर याची कारण फक्त जास्त वेळ होणारा स्क्रिनचा वापर, सतत बॅकग्राऊंडला सुरू राहणारे अॅप हेच आहे. स्मार्टफोनच्या चार्चिंग लवकर संपण्यामागे अनेक कारण आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या उपाय शोधत असतात. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपणार नाही.

ज्या अॅपमुळे तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लगेच उतरते अशा अॅप्सचा वापर टाळा. ग्राफिक्स, पॉडकास्ट साठी वापरले जाणारे अॅप बॅटरी जलद गतीने संपवतात. तसेच व्हिडिओ गेम्स ज्यामध्ये अॅड दाखवल्या जातात अशा अॅप्सना बॅकग्राउंडला चालू न ठेवता बंद करायला हवेत. बॅकग्राऊंडला चालू राहणाऱ्या अॅपमुळे बॅटरी लवकर संपू शकते. काही लोक वायफाय कनेक्शन सतत सुरू ठेवतात, यामुळेही स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते. जवळ असणाऱ्या वायफाय कनेक्शन कनेक्ट केल्यास सामान्यपणे आपला डाटा शिल्लक राहतो, त्याची बचत होते. पण त्यामुळे आपल्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते.

अनेकदा आपण फेसबुक, ट्वीटर, वेबसाईट्स यांचे नोटीफिकेशन लवकर अपडेट्स समजण्यासाठी सुरू ठेवतो. हे गरजचेदेखील असते. पण आपल्या स्मार्टफोनच्या बॅटरीचे यामुळे नुकसान देखील होते. आपल्या स्मार्टफोनच्या बॅटरीवरील ताण कमी करण्यासाठी गरजेच्या नसलेल्या अॅप्सचे नोटिफिकेशन बंद केरू शकतो. हे नोटिफिकेशन बंद करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये सोपी पद्धत आहे. नोटिफिकेशनला प्रेस करून धरल्यानंतर तिथे नोटिफिकेशन सुरू किंवा बंद ठेवायचे याबद्दल पर्याय असतो, तिथे आपण हे नोटीफिकेशन बंद करू शकतो.

पावर सेव्हिंग मोडचा पर्याय

प्रत्येक स्मार्टफोनमध्ये पावर सेव्हिंग मोडचा पर्याय असतो. जर तुम्ही या पर्यायाचा जास्त वापर केला असेल तर तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लगेच संपणार नाही. हा पर्याय बॅटरी बॅकअपसाठी महत्वाचा आहे, पण या पर्यायामुळे तुम्हाला जे अत्यंत आवश्यक आहेत असेच पर्याय तुम्हाला सुरू ठेवता येतात. जसे कॉलिंग, मॅसेजिंग शिवाय तुम्ही इतर आणखी दोन पर्याय निवडू शकता जे तुम्हाला आवश्यक आहेत. या पर्यायाने देखील बॅटरी लवकर संपणार नाही.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT