माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरातील लाॅकरमध्ये सापडला खजाना, आयकर पथकाला पैसे मोजून संपेनात!

माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरातील लाॅकरमध्ये सापडला खजाना, आयकर पथकाला पैसे मोजून संपेनात!
Published on
Updated on

नोयडा; पुढारी ऑनलाईन : माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. आयपीएस अधिकाऱ्याच्या घरी सुरू असणाऱ्या सिक्युरिटी वॉल्ट एजन्सी (लॉकर भाड्याने देण्याची सुविधा) वर आयकर विभागाने धाड टाकली. गंभीर बाब म्हणजे या अधिकाऱ्याच्या घरी ७०० लॉकर नोयडा वॉल्टस एजेन्सीने बनवले होते. यातील अनेक लॉकर्समध्ये बेनामी संपत्ती असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती.

आयकर विभागाने टाकलेल्या या धाडीदरम्यान मंगळवारी १० लॉकर उघडले आहेत. हे लॉकर कोणाच्या मालकीचे आहेत याबद्दल स्पष्टता नव्हती. या धाडीमध्ये काल संध्याकाळपर्यंत ५ कोटी ७७ लाख रूपये रक्कम आयकर विभागाला सापडली. रक्कम मोजण्यासाठी आयकर विभागाच्या टीमला तीन मशिनचा वापर करावा लागला. सतत पैसे मोजल्याने हे मशीनही हँग झाले होते. आयकर विभागाच्या नोयडामधील चैाकशी पथकाच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाल्यानंतर ही धाड टाकण्यात आली होती. यानंतर या टीमने संपुर्ण घर ताब्यात घेतले होते आणि तपास सुरू केला होता. पहिल्या दिवशी १६ लॉकरपैकी १४ लॉकरचा तपास करण्यात आला होता.

माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या कुटुंबाच्या नावाने ही एजन्सी?

आयकर विभागाच्या माहितीनुसार, या माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरी सुरू असणारी मॅनसम नोयडा वॉल्ट एजन्सी 'शशी' नावाच्या महिलेच्या नावावर आहे. ही महिला माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या कुटुंबातीलच आहे. या नावानेच ही एजन्सी गेली अनेक वर्षे सुरू होती. आयकर विभागाच्या टीमला सिक्युरिटी वॉल्टमध्ये मिळालेल्या लॉकरबाबत तपास केल्यानंतर लॉकरच्या मालकांबाबत माहिती मिळाली आहे, तसेच लॉकरच्या मालकांना चैाकशीसाठी बोलवले जात आहे. लॉकरच्या मालकांमध्ये निवृत्त आयएएस, आयपीएस, पीसीएस, डॉक्टर यांचा समावेश आहे. चैाकशीसाठी बोलवल्यानंतर लॉकरच्या मालकांकडून स्वत: न येता दुसऱ्या व्यक्तीला पाठवण्यात येत आहे.

"साहेंबांनी सांगितले होते लॉकर सुविधा सुरु आहे, एक लॉकर बुक करा".

आयकर विभागाने चैाकशीसाठी बोलवण्यात आलेला लोकांकडून वेगवेगळी उत्तरे देण्यात येत आहेत. आयकर विभागाने कॅश आणि ज्वेलरी लॉकरमध्ये ठेवण्याचा उद्देश काय होता अशी विचारणा केल्यानंतर एका व्यक्तीकडून सांगण्यात आले की साहेब तेव्हा सेवेत होते. एका कार्यक्रमात भेटले होते आणि तिथेच म्हणाले की एजन्सीची सेवा सुरू केली आहे, एक ल़ॉकर तुम्ही बुक करा. अनेक वेळेस सिक्युरिटी वॉल्टचे लॉकर सोने ठेवण्यासीठी केला जातो. पण काही लॉकर्समधून कॅशही सापडत आहे.

हेही वाचलतं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news