

पुढारी ऑनलाईन डेस्क
Gold price today : सराफा बाजारात आज बुधवारी (दि. २) सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. सोन्याचा दर २४६ रुपयांनी स्वस्त होऊन प्रति १० ग्रॅम ४८,००८ रुपयांवर आला. काल मंगळवारी सोन्याचा दर ४८,२५४ रुपयांवर जाऊन बंद झाला होता. तर चांदीचा दर प्रति किलो ६१,३७५ रुपये आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनच्या माहितीनुसार, आज बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,००८ रुपये, २३ कॅरेट ४७,८१६ रुपये, २२ कॅरेट ४३,९७५ रुपये, १८ कॅरेट ३६,००६ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा भाव २८,०६५ रुपये होता. (हे दुपारी १ पर्यंतचे अपडेटेड दर असून त्यात बदल होऊ शकतो)
दरम्यान. Gold price today मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX), एप्रिल फ्युचर्स सोन्याच्या भावांत काही प्रमाणात घसरून होऊन दर प्रति १० ग्रॅम ४७,८२५ रुपयांवर आला. याआधीच्या दिवशी दर ४७,९१२ रुपयांवर जाऊन बंद झाला होता. मार्च फ्यूचर्स चांदीच्या भावात किंचित तेजी दिसून येत आहे. चांदी प्रति किलो ६१,४२५ रुपयांवर व्यवहार करत आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर स्थिर आहेत.
२०२० मध्ये सोने दरात मोठी तेजी आली होती. दोन वर्षापूर्वी सोन्याच्या दराने ५६,२०० रुपयांपर्यंत उसळी घेत उच्चांक गाठला होता. पण २०२१ मधील ऑगस्टमध्ये सोने ४८ हजार रुपयांवर आले. त्यानंतर दरात चढ-उतार सुरुच आहे.
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.