पुढारी ऑनलाईन डेस्क :
प्रत्यक्ष सीमारेषेवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) अरुणाचल प्रदेशमधील १७ वर्षीय मिराम टेरॉन याचे अपहरण केले हाेते. त्याची २७ जानेवारी रोजी सुटका करण्यात आली. सुटकेनंतर त्याने 'इंडिया टुडे'ला विशेष मुलाखत देत अपहरणाच्या घटनेसह चीनमध्ये झालेल्या अतोनात छळाची माहिती त्याने दिली आहे.
मिराम टेरॉन हा अरुणाचलच्या सियांग जिल्ह्यातील जिदा गावचा रहिवासी आहे. मिरान हा बेपत्ता झाल्याची तक्रार १८ जानेवारी रोजी देण्यात आली होती. अरुणाचल प्रदेश राज्यातील भारत-चीन सीमेवरुन तो बेपत्ता झाला होता. तब्बल ९ दिवसानंतर चीनच्या लष्कराने त्याची सुटका केली. भारतीय जवानांनी त्याला सुखरुप त्यांच्या कुटुंबीयांच्या हवाली केले.
मिराम टेरॉन याने मुलाखतीमध्ये सांगितले की, मी आणि माझा मित्र शिकार करण्यासाठी जंगलात गेलो. त्यावेळी माझे चीनच्या लष्कराने अपहरण केले. यावेळी सैनिक नेमके कोणत्या देशाचे आहोत हेच मला समजले नाहीत. चीनच्या सैनिकांनी माझे हात आणि पाय बांधाले. माझा चेहरा एका कपड्याने झाकला. यानंतर मला चीनच्या छावणीत घेवून गेले. पहिल्या दिवशी चीनी सैनिक मला घनदाट जंगलात घेवून गेले. येथे माझा अतोनात छळ करण्यात आला. येथे मलाअमानूष मारहाण करण्यात आली. मला बांधून ठेवले. यानंतर मला विजेचा शॉकही देण्यात आल्याचे त्याने सांगितले.
मिराम बेपत्ता झाल्यानंतर १९ जानेवारी रोजी अरुणाचल प्रदेशचे खासदार तपीर गाओ यांनी या प्रकाराची सर्व माहिती ट्विटरवर दिली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भारतीय लष्करालाही टॅग केले आहे. त्यानंतर भारतीय लष्कराने तातडीने हालचाली केल्या आणि अपहृत टेरॉनला शोधण्यासाठी मदत करण्याचे आवाहन 'पीएलए'ला केले होते.
हेही वाचंल का?