Latest

पती पत्नीचा प्रणय झाला फेसबुक लाइव्ह; महिला म्हणाली…

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क :  पती पत्नीचा प्रणय झाला फेसबुक लाइव्ह झाला. सोशल मीडिया, टेक्नॉलाजीचा वापर योगरित्या केला नाही तर खासगी आयुष्य उद्ध्वस्थ होऊ शकते, याचे प्रत्यंतर एका महिलेला नुकतेच आले. रात्रीच्यावेळी प्रणय करत असताना अचानक फेसबुक लाइव्ह सुरू झाले ४६ लोकांनी ते पाहिले. त्याचा अनेकांना धक्काही बसला.

आजकाल सोशल मीडियावर अनेक जण सक्रीय आहेत आणि त्यामुळे अनेकजण रातोरात स्टारही बनलेत. वैयक्तिक आयुष्यातील फोटो, पोस्ट, व्हिडिओ शेअर करण्याकडे अनेकांचा कल असतो. सोशल मीडियाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, ही हौस फेसबुक वापरणाऱ्या एका अमेरिकन महिलेच्या चांगलीच अंगलट आली आहे.

एक दिवस पती आणि पत्नी घरात एकटेच असताना त्यांच्या प्रणयाचे खासगी क्षण कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होती. त्यावेळी मोबाइलच्या फेसबुक लाइव्हचे बटन क्लिक झाले आणि लाइव्ह सुरू झाले. जोपर्यंत ही गोष्ट तिच्या लक्षात येणार तोपर्यंत जवळपास २ लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. काही वेळाने तिने हा व्हिडिओ बंद केला. तिने टिकटॉक व्हिडिओ शेअर करून आपल्याला आलेला अनुभव शेअर केला आहे.

या महिलेने तिच्या टिकटॉक व्हिडीओवर हा प्रसंग सांगितला आहे. 'मला पतीसोबतचे खासगी क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याची इच्छा होती. मी मोबाईलवर रेकॉर्डिंग सुरू केले. तेव्हा अचानक फेसबुक लाईव्ह सुरू झाले. माझे खासगी क्षण लोकांनी लाइव्ह पाहिले. माझ्या वडिलांनीही ते पाहिले. त्यामुळे माझी मान शरमेने खाली गेली.

फेसबुक लाईव्ह व्हिडिओ कसा सुरू झाला हे माहिती नाही. जवळपास ४६ लोकांनी ते पाहिले. त्यात वडीलही होते. जेव्हा मला या गोष्टीची कल्पना आली तेव्हा आठवडाभर मी कुठेही बाहेर गेली नाही. मी खोलीत खूप रडत बसले. मी माझा फोन लॉक केला नव्हता. मी रोमान्स करत असताना अचानक फेसबुक लाइव्ह सुरू झाले.' खुलासा करणारा हा महिलेचा व्हिडिओ २ लाख लोकांनी पाहिला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT