channaraj hattiholi : ‘..हा तर काँग्रेस पक्षाच्या सांघिक कार्याचा ऐतिहासिक विजय’ | पुढारी

channaraj hattiholi : ‘..हा तर काँग्रेस पक्षाच्या सांघिक कार्याचा ऐतिहासिक विजय’

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार सतीश जारकीहोळी आणि माझ्या भगिनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नियोजनबद्धरीत्या प्रचाराचे काम केले. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास या निवडणुकीत निश्चित कामी आला. त्यामुळेच आजचा माझा हा विजय काँग्रेस पक्षाच्या सांघिक कार्याचा ऐतिहासिक विजय आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसचे विजयी उमेदवार चन्नराज हट्टीहोळी (channaraj hattiholi) यांनी दिली आहे.

चन्नराज हट्टीहोळी पुढे म्हणाले की, आजच्या विजयानंतर मी आमदार झालो असलो तरीही, पक्षासाठी एक सर्वसामान्य कार्यकर्ताच आहे. भावी काळात आमचे ज्येष्ठ नेते सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे कार्य जास्तीत जास्त जोमाने पुढे नेण्याचे काम करणार आहे. त्याचबरोबर जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मी वचनबध्द आहे.माझ्या भगिनी आम. लक्ष्मी हेब्बाळकर या लढाऊ वृत्तीच्या आहेत. त्यांनी मला नेहमी कामात लक्ष आणि यशाचा कानमंत्र दिला आहे. असेही ते पुढे म्हणाले.

Back to top button