VIDEO : शिवरायांवरची श्रद्धा बघून नेटिझन्स म्हणाले जिंकलस भावा…! | पुढारी

VIDEO : शिवरायांवरची श्रद्धा बघून नेटिझन्स म्हणाले जिंकलस भावा...!

पुणे : पुढारीऑनलाईन : बघतोस काय मुजरा कर…! जय शिवराय अशा.. घोषणांसह महाराजांच्या प्रतिमा मिरवण्यात धन्यता मानणारी; मात्र प्रत्यक्षात महाराजांच्या आदर्शाचा लवलेशही नसणारी काही मंडळी गल्लो गल्ली दिसतील; मात्र ऐन ट्रॅफिक जाममध्ये एका गाडीवर लावण्यात आलेल्या शिवरायांच्या प्रतिमेवर पडलेली धूळ दिसताच स्वत:च्या हातरुमालाने ती स्वच्छ करणाऱ्या एका दुचाकीस्वार शिवभक्ताचा व्हीडिओ समाज माध्यमांवर (सोशल मिडीयावर) तुफान व्हायरल होत आहे.

ऐन वर्दळीच्यावेळी घडलेली ही कौतुकास्पद घटना या युवकाच्या गाडीच्या मगून येणऱ्या वाहनातील कोणीतरी चित्रित केली. यावेळी ते ‘छान रे मित्रा… ‘तुम्हाला जर महाराजांचा मान राखता येत नसेल ना, सांभाळता येत नसेल ना तर लावू नये फोटो’ अशा शब्दात या शिवभक्ताचे कौतुक करत आहेत.

दोन लाख जणांनीपाहिला व्हीडीओ

आतापर्यंत हा व्हिडिओ जवळपास दोन लाख जणांनी पहिला असून, नेटिझन्सनी या शिवभक्तांच्या कृतीला मुजरा केला आहे. अनेकांनी या युवकाचे कौतुक करताना काही नेटिझन्सनी, महाराजांची प्रतिमा लावून तिची निगा न राखणाऱ्याना चांगलेच सुनावले आहे. नुसती प्रतिमा लावून मिरवण्यापेक्षा त्यांचे आदर्श जगा…निगा रखायला जमत नसेल तर प्रतिमा लावताच कशाला….! असेही शिवभक्त व्यक्त झाले आहेत.

गणेश गायकवाड नावाच्या फेसबुक अकाऊंट वर हा व्हिडिओ शेयर करण्याताला आहे. त्यावर दिलेल्या माहितीच्या आधारे हा व्हिडिओ पुण्यातील येरवडा भागात असलेल्या फोनिक्स मॉल जवळ असलेल्या सिग्नलवर घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा

पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना फुटली!, उच्च न्यायालयात याचिका दाखल

विधानपरिषद : तिन्ही पक्ष एकत्र आले तरी ते भाजपचा पराभव करू शकत नसल्याचे सिद्ध : देवेंद्र फडणवीस

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहली याने घेतला ‘हा’ धक्कादायक निर्णय

सातारा : शिंगणापूर घाटात ४०० फूट खोल दरीत कार कोसळली; मायलेकरांचा मृत्यू

Back to top button