Latest

 Glowing Skin Home Remedies :  काही मिनिटांमध्‍ये त्‍वचा उजळेल, फक्‍त ‘हे’ घरगुती उपाय करुन पाहा

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  तुम्हाला असं वाटतयं का? तुमची त्वचा रुक्ष, काळी आणि खराब झाली आहे. तसे असेल तर  पुढील घरगुती उपाय करा आणि काही दिवसांमध्‍येच तजेलदार त्वचा अनुभवा. हे उपाय तुम्हाला तुमच्या घऱातचं ( Glowing Skin Home Remedies ) करता येणारे आहेत. कमी वेळेत आणि अगदी कमी खर्चात. चला तर मग पाहूया काय आहेत हे उपाय.

आपल्या घरात बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपला चेहरा उजळण्यासाठी मदत करत असतात. आपण याचा योग्यरित्या वापर केला तर तुम्हाला नेहमी ब्‍युटी पार्लरला जायची गरज भासणार नाही. मात्र अनेकांना या पदार्थांचा वापर करुन त्वचा कशी उजळावी, याबद्दल  माहिती नसते.

 Glowing Skin Home Remedies : पपई

पपई हे अशा फळांपैकी एक आहे जे त्वचेतील मृत पेशी आणि त्वचेतील घाण काढून टाकते. तसेच चेहऱ्यावर सुरकत्या पडण्‍यापासूनही वाचवते. तुम्‍ही तुमच्‍या चेहर्‍याला आठवड्यातून एकदा पपई लावा. पपईचा लगदा हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा. साधारणता १५ मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा.

डाळीचे पीठ/ बेसन पीठ

बेसनचा वापर अनेक फेस पॅक बनवण्यासाठी केला जातो. बेसन पीठाचा उपयाेग चेहऱ्याला करण्यासाठी सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग म्हणजे ते दुधात मिसळणे. गरजेनुसार, बेसन घेऊन दुधाची पेस्ट बनवा. त्यात चिमूटभर हळद टाका. ही पेस्ट 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. तुम्‍ही हे आठवड्यातून दोनदा करु शकता.

ओट्स

चेहर्‍याला स्क्रब करण्याचीही गरज असते. जेणेकरून चेहऱ्यावरील जमा झालेली घाण आणि ब्लॅकहेड्स यासाठी २ चमचे ओट्स बारीक करून त्यात दही मिसळा. ते चेहऱ्यावर लावा, दाेन मिनिटे घासून धुवा. त्याचा परिणाम तुम्हाला चेहऱ्यावर लगेच होवू शकतो.

 Glowing Skin Home Remedies : हळद

चेहरा सावळा दिसू नये म्हणून हळद थोड्या प्रमाणात चेहऱ्यावर लावली जाते. यासाठी 2 ते 3 चिमूट हळद मधात मिसळा आणि 10 मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर धुवा. त्वचेची चमक कायम राहते. आणि चेहऱ्यावर जर का पुरळ (पिंपल्स) येण्यापासूनही बचाव करते.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT