Life Style : टी.व्ही. पाहता-पाहता सायटिका-लकवा सारखे 84 आजार दूर पळवा, फक्त हे करा…

Life Style : टी.व्ही. पाहता-पाहता सायटिका-लकवा सारखे 84 आजार दूर पळवा, फक्त हे करा…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Life Style टी.व्ही. पाहता-पाहता सायटिका-लकवा सारखे तब्बल 84 आजार दूर पळवून लावता येईल. वाचून आश्चर्य वाटले ना? टी. व्ही. पाहता-पाहता असे गंभीर आजार कसे दूर होऊ शकतात. टी.व्ही. काय औषध आह? असा प्रश्न डोक्यात आला असेल ना? पण हे होऊ शकते. त्याला कारण आहे आपले प्रभावी योगशास्त्र. योग हे जवळपास सर्वच आजारांवर उत्तम औषध आहे.

आता तुम्हाला पुन्हा प्रश्न पडला असेल टी.व्ही पाहता-पाहता योगासन कुठे करतात का? इथे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की आपल्याला टी.व्ही. पाहता-पाहता योगासन करायचेच नाही. मग नेमकं काय करायचे आहे. आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी दीर्घकाळ अभ्यास करून आपल्यासाठी खूप मोठा ठेवा ठेवला आहे. ज्यामध्ये सर्व समस्यांची उत्तरे आहेत. एखाद्या दीर्घकालीन गंभीर आजाराला दूर करण्यासाठी बसल्या जागी काय उपाययोजना करता येतील याचे संशोधन भगवान महावीर, गौतम बुद्ध तसेच आपल्या ऋषी मुनींनी करून ठेवले आहे. गरज फक्त इतकीच आहे तुम्हाला ते आपल्या आजच्या Life Style सोबत जुळवून घ्यायचे आहे.

जसे प्राणायाम आणि ध्यान हे योगशास्त्राचे अभिन्न अंग आहे. तसेच मुद्रा रहस्य हे देखिल योगशास्त्राचे एक अविभाज्य अंग आहे. तुम्ही गौतम बुद्ध, महावीर तसेच पातंजल ऋषी किंवा अन्य हिंदू देवी देवतांना आपल्या बोटांची किंवा हातांची वेगवेगळी रचना करून ध्यानस्थ बसताना पाहिले असेल. या बोटांच्या किंवा हातांच्या केलेल्या विशिष्ट रचनांना मुद्रा असे म्हणतात. तुमच्या तळहातावर तुमच्या शरीराच्या जवळपास सर्व नाड्या एकवटलेल्या असतात. तसेच ज्या पंचमहाभूतांनी हे शरीर बनले आहे. ती पाच तत्वे देखील तुमच्या तळहातावर सामावलेली असतात. या तत्वांचे शरीरातील बिघडलेले प्रमाण आपण वेगवेगळ्या मुद्रा लावून आपण समान करू शकतो. त्यामुळे आजार दूर होण्यास मदत होते.

ध्यान करताना या मुद्रा केल्याने विशेष फायदे मिळतात. मात्र आजच्या Life Style मध्ये आपण जुन्या काळाप्रमाणे तास न तास ध्यान करू शकत नाही. मग मुद्रा कधी करायच्या हा प्रश्न उरतो. इथेच उत्तर दडले आहे. टी.व्ही. पाहता-पाहता देखिल या मुद्रा करता येतात. मुद्रा हे आजार दूर करण्यासाठी पूरक उपचार पद्धती म्हणून प्राचीन काळात वापरत असत. मुद्रा या अनेक प्रकारच्या असतात.

वेगवेगळ्या मुद्रा वेगवेगळ्या आजारावर सहाय्यक ठरतात. त्यापैकीच एक वायू मुद्रा…

सर्व प्रकारचे वात रोग, सायटिका, लकवा, पोटाचे विकार, गुडघे दुखी असे 84 आजार वायू मुद्रेने दूर होऊ शकतात. कारण हे सर्व आजार शरीरात वायू तत्व बिघडल्याने होतात. त्यामुळे वायू मुद्रा ही या रोगांवर प्रभावी उपचार ठरते. ती शरीरातील वायू तत्वाला पुन्हा सम पातळीत आणण्याचे काम करते. वायू तत्त्वाचे प्रमाण योग्य झाल्यास हे आजार कमी होण्यास मदत होते.

वायू मुद्रा कधी-कशी लावावी…

वायू मुद्रा ही अंगठा आणि तर्जनी (अंगठ्या जवळील पहिले बोट) मिळून लावता येते. तर्जनीला अंगठ्याच्या खालच्या भागाला चिकटवून अंगठा हा नंतर तर्जनीवर घ्या. दोन्ही हातांनी ही मुद्रा करा. 48 मिनिटे ही मुद्रा लावून बसल्याने लवकर फायदे मिळतात. ही मुद्रा तुम्ही झोपताना किंवा टी व्ही पाहता-पाहता करून बसू शकता. सामान्यपणे एक व्यक्ति दिवसात किमान एक तास तरी टीव्ही पाहतात. टी.व्ही पाहताना वायू मुद्रा लावून बसा एक तास कसा निघून जाईल कळणार ही नाही. फक्त एक लक्षात घ्या जेवल्यानंतर मुद्रा लावू नये. जेवणानंतर तासाभराने ही मुद्रा करावी. मुद्रा कशी लावावी हे नीट समजून घेण्यासाठी सोबत दिलेला फोटो पाहा. वज्रासनात बसून ही मुद्रा लावल्यास अधिक लवकर फायदा मिळतो. मग कसली वाट पाहत आहात. टी.व्ही. पाहत बसला असाल तर नुसते बसू नका. मुद्रा लावून बसा…आणि चांगल्या आरोग्य मिळवा.

अशी लावा वायू मुद्रा – फोटो पाहा…

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news