Life Style : …’हा’ सोपा उपाय करा आणि चेह-यावरील पिंपल्स, डाग पळवून लावा | पुढारी

Life Style : ...'हा' सोपा उपाय करा आणि चेह-यावरील पिंपल्स, डाग पळवून लावा

पुढारी ऑनलाइन डेस्क : Life Style : आपला चेहरा एकदम तजेलदार, कोणतेही डाग नसलेला, पिंपल्स, फोडे, फुन्सी नसलेला हवा असतो. सौंदर्य कोणाला नको असते. प्रत्येकालाच हवे असते. मात्र या सौंदर्याला ग्रहण लावणारे पिंपल्स, पुटकूळ्या डाग यांसारख्या समस्यांनी किशोरावस्थेपासून ते तारुण्यापर्यंत सगळेच पछाडलेले असतात. तर प्रौढावस्थेत तारुण्य दीर्घकाळ टिकवण्याची धडपड असते. आहा! तुम्ही 40 च्या नाही तीसच्याच वाटतात!असं कोणी म्हटलं की मनमोराचा पिसारा एकदम फुलायला लागतो.

मात्र, सौंदर्य समस्यांपासून कोणाची सुटका झाली आहे का? किशोरावस्थेत तुम्ही पदार्पण केले की तुमच्या चेह-यावर पिंपल्स यायला सुरुवात होते. एकतर आधीच शरीरात आणि मनात होणा-या भावनिक बदल, त्यात हे असे पिंपल्स किंवा अन्य सौंदर्य समस्या सुरू झाल्या की तुम्ही एकदम चिडचिडे होतात. तसे तर या समस्यांवर हजारोंनी उपाय आजपर्यंत शोधण्यात आले आहेत. अगदी प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत पिंपल्स आदी सौंदर्य समस्यांवर उपाय शोधलेच जात आहे. पण तरीही कोणाला कशाने फरक पडेल हे सांगता येत नाही. कारण प्रत्येकाची शारीरिक मानसिक जडण-घडण वेगवेगळी असते. Life Style

अशाच या सौंदर्य समस्यांवर इथे एक हमखास प्रभावी उपाय मुद्रा रहस्यांमध्ये सांगितलेला आहे. तुम्ही पाहिले असेल अनेकदा शास्त्रीय नृत्य करणा-या महिलांचा चेहरा खूपच सुंदर असतो. आणि त्यांना या समस्या थोड्या कमी प्रमाणात जाणवतात. असे का होतात. कारण आपल्या शास्त्रीय नृत्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा हातांनी केल्या जातात. नृत्याचा सराव तासन् तास केला जातो. परिणामी त्यांना या मुद्रांचा उपयोग त्यांच्या सौंदर्य वाढीसाठी होता. Life Style

आपल्या शरीराच्या जवळपास सर्व नाड्या या तळहातांवर एकवटलेल्या असतात. तसेच अॅक्युप्रेशरचे अनेक पॉइंट्स तळहातावर असतात. तसेच आपल्या तळहातात मूल पंचतत्वे ज्याने माणसाचे शरीर बनले आहे ती सामावलेली असतात. पृथ्वी, जल, अग्नि, वायू, आकाश या पंचतत्वाच्या शरीरातील संतुलनाने आपले अनेक आजार दूर होण्यास मदत मिळते. हाताच्या बोटांच्या वेगवेगळ्या मुद्रा केल्याने त्यांचे वेगवेगळे फायदे मिळतात. त्यापैकीच वरुण मुद्रा ही एक. Life Style

आपला चेहरा आणि त्वचेच्या सौंदर्य समस्या या प्रामुख्याने जलतत्वाशी निगडीत असतात. त्यामुले जलतत्वाचे संतूलन करण्यासाठी मुद्रा रहस्यामध्ये वरुण मुद्रा करण्यास सांगितले आहे. वरुण मुद्रा ही रक्तातील दोष दूर करते त्यामुळे चेह-यावर पिंपल येण्याचे प्रमाण आपोआपच कमी होत जाते. तसेच ही मुद्रा जल तत्वाच्या कमतरतेला भरून काढते त्यामुळे त्वचेचा रूक्षपणा दूर होतो. तसेच त्वचेची स्निग्धता वाढते. त्यामुळे चेहरा आणि त्वचा ही नितळ स्वच्छ राहते आणि तेजस्वी बनते. Life Style

या मुद्रेमुळे तुमचे तारुण्य अधिक काळापर्यंत टिकून राहते. चेह-यावर सुरकुत्या पडत नाही. त्यामुळे नियमितपणे या मुद्रेचा अभ्यास केल्याने तुम्ही चाळीशीत तिशीचे दिसू शकता. त्याचप्रणाणे डोळ्यांमधील जळजळ दूर होऊन डोळे सुंदर पाणीदार दिसतात. त्याच प्रमाणे विविध प्रकारचे चर्मरोग, पित्त तसेच मुत्रपिंडांच्या देखिल समस्यांमध्ये ही मुद्रा लाभदायक ठरते. Life Style

अशी लावा वरुण मुद्रा
करंगळी आणि अंगठा यांचे अग्रभाग म्हणजेच सर्वात वरचे टोक जुळवल्याने वरुण मुद्रा बनते. ही मुद्रा 24 मिनिटे ते 48 मिनिटांपर्यंत करायला हवी. या मुद्रेचे फायदे लवकर मिळवण्यासाठी पद्मासनात बसून ही मुद्रा करा. ध्यान करताना किंवा योगाभ्यासानंतर या मुद्रेचा अभ्यास केल्यास फायदे जलदगतीने मिळतात. तेव्हा वेळ नसेल तर टीव्ही पाहता-पाहता ही मुद्रा लावून बसा. फक्त एक लक्षात ठेवा जेवणानंतर लगेच मुद्राभ्यास करू नये. जेवणानंतर किमान एक तासाने मुद्रा लावावी.

ही मुद्रा कशी लावावी यासाठी खालील फोटो पाहा...

हे वाचलंत का?

Back to top button