पुढारी ऑनलाइन डेस्क : आजकालच्या आपल्या धवत्या आणि वेगवान Life Style मध्ये वजन हा जवळपास सर्वांच्याच चिंतेचा विषय असतो. काहींना वजन कमी होत नाही म्हणून सतत काळजी असते. तर काहींचे वजन वाढतच नाही. गोळ्या खाऊन, जिमला जाऊनही अनेकांचे वजन वाढतच नाही. जेवण वाढवले तरी वजन वाढत नाही. वजन वाढवणा-या अधिक कॅलरीजच्या सर्व प्रकारच्या गोष्टी करूनही वजन वाढत नाही. अशी समस्या तुम्हालाही आहे का? तुम्ही वजन न वाढण्याच्या समस्याने त्रस्त आहात का? आणि वजन वाढीसाठी ट्रीटमेंटवर तुम्ही खूप पैसे खर्च करून वैतागला आहात का? मग हा विनाखर्ची उपाय तुम्हाला एकदा तरी करून पाहायला हवा…
आपल्या या आजकालच्या धावपळीच्या Life Style मध्ये आपण अनेकदा आपल्या जवळ अगदी सहज सोपे उपाय उपलब्ध असताना नकळतपणे दूर्लक्ष करतो. असाच एक उपाय आहे जो मुद्रा रहस्यामध्ये सांगितलेला आहे. आपला तळहात आणि आपल्या हाताची बोटे यांच्या वेगवेगळ्या पोझिशन तयार करून आपण आपले अनेक आजार बरे होण्यासाठी त्याचे फायदे उचलू शकतो. मानवी शरीर हे पंचमहाभूतांनी बनले आहे. पृथ्वी, जल, आकाश, वायू आणि अग्नि यांचे विशिष्ट प्रमाण आपल्या शरीरात ठरले असते. हे संतून बिघडले की आपल्याला वेगवेगळे आजार होतात.
वजन वाढीचा संबंध हा पृथ्वी तत्वाशी निगडीत असतो. त्यामुळे शरीराचे पृथ्वी तत्व संतुलित करणे गरजेचे आहे. असे मुद्रा रहस्य सांगते. त्यामुळे वजन वाढीवर पृथ्वी मुद्रा ही प्रभावी ठरते. ज्याप्रमाणे पृथ्वी आपल्या शरीराचे पोषण करते. त्याप्रमाणे पृथ्वी मुद्रा ही शरीराचे पोषण करते. त्यामुळे पृथ्वी मुद्रा एक प्रकारचे नैसर्गिक टॉनिक आहे.
Life Style कशी करतात पृथ्वी मुद्रा
अनामिका (करंगळी जवळचे बोट) आणि अंगठा या दोघांचा अग्रभाग हलकेच जोडल्याने पृथ्वी मुद्रा तयार होते. अनामिका ही रजोगुणी असते. तिच्यामुळे तुमच्या शरीरातील तामसिक गुण कमी होऊन रजोगुण वाढीस लागतात. दुर्बळ, नाजूक, दुबळ्या व्यक्तिंना त्यांच्या इच्छे प्रमाणे वजन वाढवण्यासाठी ही मुद्रा सहाय्यक ठरते. दररोज अभ्यास केल्याने याचे चांगले लाभ होतात. पृथ्वी मुद्रेमुळे शरीरात प्रखर उर्जेचा संचार होतो. संकिर्णता मिटते. आंतरिक सुक्ष्म तत्वांमुळे शरीरात महत्वपूर्ण बदल घडतात. सुखासन किंवा वज्रासनात बसून ही मुद्रा केल्याने फायदे लवकर मिळतात. सकाळी 24 मिनिटे आणि संध्याकाळी 24 मिनिटे अशी 48 मिनिटे ही मुद्रा करावी. जेवणानंतर मात्र मुद्रा लावू नये. कोणतीही मुद्रा जेवणानंतर एक तासाने लावावी.
तर कसा वाटला वजन वाढीवरील हा विनाखर्चिक उपाय कमेंट करून सांगाच…
पृथ्वी मुद्रा कशी लावावी फोटो पाहा…
हे ही वाचा :