LifeStyle : हिरोइन किंवा मॉडेलसारखं आकर्षक फिगर हवे आहे? मग तुमच्या झोपण्याच्या सवयी बदला… | पुढारी

LifeStyle : हिरोइन किंवा मॉडेलसारखं आकर्षक फिगर हवे आहे? मग तुमच्या झोपण्याच्या सवयी बदला...

पुढारी ऑनलाइन डेस्क : चित्रपट, फॅशन तसेच मॉडेलिंग इंडस्ट्रीजचा लोकांच्या LifeStyle वर खूप मोठा प्रभाव पडतो. त्यात सोशल मीडिया आणि टेक्नो क्रांतीमुळे आख्ख जग तुमच्या हातात सामावलं आहे. त्यामुळे जगातील एका कोप-यातील व्यक्तिचा पेहराव किंवा LifeStyle क्षणात जगाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचते. त्यामुळे त्यांच्यासारखे दिसणे किंवा त्यांच्यासारखी आकर्षक फिगर बनवणे हे आजच्या प्रत्येक तरुण-तरुणींचे स्वप्न आहे. हिरोइन किंवा मॉडेलसारखं शरीर मिळवण्यासाठी आजचे युवा हिरो-हिरोइनची LifeStyle कॉपी करण्याचा प्रयत्न करतात.

Life Style : तुमच्या घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडते का? हे असू शकते कारण…

अनेक जण सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल अकाउंटवर शेअर केलेल्या जिम किंवा योगासनाच्या टिप्स फॉलो करतात. तर अनेक जण यु ट्यूबवर जाऊन योगा ट्रेनर किंवा डायटिशिअनचे चॅनेल फोलो करतात. त्यांनी दिलेल्या टिप्स फोलो करतात. काही जण झुंबा, हिपहॉप असे डान्स क्लास लावतात. तर काही जण यासाठी मार्केटमधील वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्ट ड्रिंक घेतात. कोणाला पारंपारिक तेल मालीश किंवा अन्य गोष्टी करायची सवय लागते.

हे सर्व कशासाठी तर LifeStyle त्यांना आवडणा-या सेलिब्रिटिंबसारखं आकर्षक फिगर कमावण्यासाठी. परंतु अनेक वेळा हे सर्व करत असताना अनेकांना याच्या वेगवेगळ्या साइड इफेक्ट्सना सामोरे जावे लागते. याचे कारण म्हणजे प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे असते. तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींना ज्या गोष्टी सुटेबल होतात. त्या तुम्हालाही होतीलच असे नाही. त्याच प्रमाणे आपल्याला दैनंदिन आयुष्यात आपण ज्या चुका करतो त्याचे भान नसते किंवा अनावधनाने माहितीच्या अभावी त्या होतात.

LifeStyle तुम्हाला माहिती आहे का तुमच्या झोपण्याच्या सवयींचा तुमच्या फिगरवर मोठा परिणाम होत असतो. एका व्यक्तिला सामान्यपणे सहा ते सात तास झोप आवश्यक असते. ती जर पुरेशी होत नसेल तर तुमच्या शरीरावर अतिरिक्त ताण पडून त्याचे परिणाम तुमच्या सुडौल बांधा खराब होण्यावर होतो. काही जणांचे वजन खूपच कमी होते. तर काही जणांचे वजन वाढते. तसेच खूप जास्त झोपल्याने देखिल मान, दंड, मांड्या आणि कमरेच्या काही भागावर चरबी सुटते. त्यामुळे जास्त झोपणे किंवा दिवसा झोपणे टाळावे, असे योगशास्त्र सांगते.

याशिवाय तुम्ही झोपताना कोणत्या पोझिशनमध्ये झोपता यावर ही तुमच्या फिगरचा आकार ठरतो. LifeStyle तुम्ही कधी अनुभवले आहे का, व्यायाम, योगासने, किंवा डाएट केल्यानंतरही तुम्हाला हवे तसे फिगर मिळवता येत नाही. याचे एक महत्वाचे कारण आहे. चुकीच्या पोझिशनमध्ये झोपणे. तुमच्यापैकी अनेक जण झोपताना पोटावर झोपता, किंवा एक पाय पोटात घेऊन झोपता. काही जण तर फॅनच्या वा-यामुळे दोन्ही पाय पोटात घेऊन झोपता. जेणेकरून थंडी वाजत नाही. तर काहींना आपले पूर्ण शरीर आळीप्रमाणे गोल करून एक हात डोक्याखाली घेऊन झोपण्याची सवय असते. मात्र या सर्व सवयी अगदी चुकीच्या आहेत.

LifeStyle योगशास्त्रानुसार झोपण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मान दुखी कंबर दुखी तर जडतेच पण तुमचे शरीर कुठे जाड तर कुठे बारीक होते. तुम्ही जर दोन्ही पाय पोटात घेऊन झोपत असाल तर तुमच्या नितंबाचा भाग वाढतो. तसेच एक पाय पोटात घेऊन झोपल्याने पोट सुटते. त्यामुळे तुमच्या पोटाचा भाग छाती खाली निमुळता किंवा बारीक बनतो तर नाभी खाली मोठा होतो. यालाच बेलि फॅट असेही म्हणतात. जी अनेक महिला पुरुषांची मुख्य समस्या आहे.

LifeStyle काय आहे योगशास्त्रानुसार झोपण्याची चांगली स्थिती-

योग सांगते की झोपताना सुरुवातीला काही काळा डाव्या कुशीवर सरळ झोपावे. जेणेकरून रात्रीचे जेवण पचण्यास मदत होते. त्यानंतर काही वेळाने झोपताना अगदी सरळ झोपावे. सरळ एका रेषेत झोपल्याने तुमच्या शरीरावर अतिरिक्त चरबी चढत नाही. तसेच पोट, नितंब आणि मांड्यांचा भाग एकसारखा राहतो. तो कमी जास्त वाढत नाही. याचा फायदा तुम्हाला योगासन करताना देखिल होतो. शरीर लवचिक होते. आणि योगासन करणे देखिल सोपे जाते. याचा एकूण परिणाम तुमचे फिगर चांगले आकर्षक बनू लागते.

हे ही वाचा

Life Style : तुमच्या घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडते का? हे असू शकते कारण…

Flying Bike : बाईक प्रेमींसाठी खुशखबर! बस, कारनंतर हवेत उडणारी जगातील पहिली बाईक…

Back to top button