Latest

पंतप्रधान नरेंद्र मोदी रोममध्ये दाखल, ५ दिवसांचा दौरा

backup backup

G-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदी पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यावर असून, त्यासाठी ते रात्री उशिरा रवाना झाले आहेत. पीएम मोदी स्कॉटलंडमधील ग्लासगोलाही भेट देणार आहेत. ते इटलीमध्ये आयोजित G-20 शिखर परिषदेत इतर G-20 नेत्यांसोबत साथीच्या रोगातून बाहेर पडणे, जागतिक अर्थव्यवस्था आणि हवामान बदल यावर चर्चा करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रोम मध्ये, कोरोना महामारीपासून जागतिक आर्थिक आणि आरोग्य पुनप्राप्तीवर चर्चा करणार आहेत. तसेच कार्बन स्पेसच्या समान वितरणासह जलवायू हवामान बदलासंबंधी चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रैगी यांच्या निमंत्रणावरून ते 29 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत रोम आणि वेटिकन सिटीमध्ये असतील. त्यानंतर 1 ते 2 नोव्हेंबर या कालावधीत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या निमंत्रणावरून ग्लासगो भेट देतील.

कोरोना काळानंतर G-20 ची ही पहिलीच परिषद आहे. ज्यात जगातील मोठे नेते असणार आहेत. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करुन दिली आहे. वेटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शिखर परिषदेव्यतिरिक्त ते इतर सहयोगी देशांच्या नेत्यांनाही भेटतील आणि त्यांच्याशी भारताच्या द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतील.

रोमनंतर ग्लासगोसाठी होणार रवाना

३१ ऑक्‍टोबर रोजी G20 शिखर परिषदेनंतर ते युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) (COP-26) मधील पक्षांच्या २६ व्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी ग्लासगोला रवाना होतील. G20 मध्ये पीएम मोदी हवामान बदल आणि स्वच्छ ऊर्जा विस्तारावर भारताच्या सर्वोत्तम कार्याबद्दल सांगतील.

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT