Facebook चे नाव बदलले, आता ओळखले जाणार ‘या’ नावाने | पुढारी

Facebook चे नाव बदलले, आता ओळखले जाणार 'या' नावाने

पुढारी ऑनलाईन डेस्क

सोशल मीडियावर अग्रेसर असणाऱ्या फेसबुकने (Facebook) आपले नाव बदलले आहे. आता जगभरात फेसबुक ‘META’ नावाने ओळखले जाणार आहे. गुरुवारी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने कंपनीच्या बैठकीत ही घोषणा केली. अनेक दिवसांपासून नाव बदलण्याची चर्चा सुरु आहे. अखेर नाव बदलण्याची प्रक्रिया संपली आहे. फेसबुकला ‘META’ (मेटा) असे नाव दिले आहे.

मार्क झुकेरबर्गला त्याच्या सोशल मीडिया कंपनीचे रिब्रॅंडिंग करायचे होते. या कंपनीला पूर्णपणे वेगळी ओळख द्यायची होती. फेसबुकला फक्त एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून पाहिले जात नाही. आता त्याच दिशेने वाटचाल करत फेसबुकचे नाव बदलून ‘META’ करण्यात आले आहे. कंपनीचे लक्ष आता एक मेटाव्हर्स तयार करण्यावर आहे, ज्याद्वारे एक आभासी जग सुरू केले जाऊ शकते. जिथे कम्युनिकेशन आणि ट्रांसफरसाठी वेगवेगळी साधने वापरली जाऊ शकतात.

नवीन नावाचा अर्थ काय आहे?

फेसबुकचे नवे नाव फेसबुकचे माजी सिविक इंटिग्रिटी चीफ समिध चक्रवर्ती यांनी सुचवले आहे. आता मार्क झुकेरबर्ग अगोदरच व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि ऑगमेंटेड रिअॅलिटीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याने, त्यांच्या कंपनीचे नाव बदलून मेटा करणे ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नव्हती. आता या नव्या नावाद्वारे झुकेरबर्ग जगासमोर फक्त एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपुरते मर्यादीत राहणार नाही.

आता कंपनीने आपले नाव बदलले आहेच. पण त्यांनी अनेकांसाठी नव्या रोजगाराच्या संधीही खुल्या झाल्या आहेत. नोकरीच्या जागा उपलब्ध केल्या आहेत. फेसबुक फक्त रिब्रँडिंग करत नाही. तर १० हजार नव्या लोकांना नोकरी देण्याची तयारी करत आहे. हे सर्व मेटाव्हर्स सारखे जग तयार करण्यास मदत करणार आहेत.

नाव का बदलावे लागले?

फेसबुकवर (Facebook) ज्यावेळी आरोप होत होते त्याचवेळी कंपनीचे नाव बदलण्याचे ठरले होते. अस म्हटलं जात आहे की, फेसबुक आपल्या युजरचा डाटा सुरक्षित ठेवत नाही. काही दिवसांपूर्वी फेसबुकचा माजी कर्मचारी फ्रान्सिस हॉगेनने काही गुप्त कागदपत्रे लीक केली होती, तेव्हाच फेसबुकने स्वतःच्या नफ्याला वापरकर्त्यांच्या सुरक्षेपेक्षा जास्त स्थान दिले असल्याचे समोर आले होते. मार्क झुकेरबर्गने हे आरोप फेटाळून लावले होते. पण फेसबुकला याचा मोठा फटका बसला होता.

आता फेसबुकने आपले नाव बदलले आहे. मार्क झुकरबर्गने वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीची काळजी घेतली असल्याचे म्हटले आहे. आपल्या भाषणात, मार्क झुकेरबर्गने म्हटले की, अशा सुरक्षा नियंत्रणांची येत्या काळात आवश्यकता असेल. जेणेकरुन मेटाव्हर्सच्या जगात कोणत्याही मानवाला इतरांच्या जागेत जाण्याची परवानगी मिळणार नाही.

हेही वाचलत का?

Back to top button