बारामती, पुढारी वृत्तसेवा
पुणे विभागातील सर्वात मोठी मल्टी शेड्युल्ड बॅंक असलेल्या बारामती सहकारी बॅंकेची (Baramati) पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यास अखेर राष्ट्रवादी काॅंग्रेसला यश आले.
नाट्यमय घडामोडीनंतर कॉंग्रेसचे पदाधिकारी डॉ. विजयकुमार रामचंद्र भिसे यांचा खुल्या व अनुसुचित जाती- जमाती प्रवर्गातील तर त्यांची कन्या डॉ. प्रतिक्षा यांचा महिला राखीव गटातील उमेदवारी अर्ज मागे घेण्यात यश आले. परिणामी राष्ट्रवादीने सुटकेचा निश्वास टाकला.
राष्ट्रवादीने मंगळवारीच सहकार प्रगती पॅनेल जाहीर केला होता. निवडणूक बिनविरोध करण्याचे आटोकाट प्रयत्न राष्ट्रवादीकडून झाले. अखेर त्यात त्यांना यश आले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, नगरपरिषदेचे (Baramati) गटनेते सचिन सातव, तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप आदींनी या कामी महत्त्वाची भूमिका बजावली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंकेने अल्पावधीतच प्रगतीचे शिखर गाठले आहे. सहा जिल्ह्यांत ३६ शाखांद्वारे बॅंकेचे काम चालते.
क्रियाशील सभासदांचा सर्वसाधारण मतदार संघ : सतिन सदाशिवराव सातव, मंदार श्रीकांत सिकची, रणजित वसंतराव धुमाळ, जयंत विनायकराव किकले, नुपूर आदेश शहा वडूजकर, देवेंद्र रामचंद्र शिर्के, डॉ. सौरभ राजेंद्र मुथा, किशोर शंकर मेहता, अँड. शिरीष दत्तात्रय कुलकर्णी आणि नामदेवराव निवृत्ती तुपे.
महिला राखीव प्रतिनिधी : कल्पना प्रदीप शिंदे आणि वंदना उमेश पोतेकर.
भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग : उद्धव सोपानराव गावडे.
इतर मागासवर्ग प्रतिनिधी : रोहित वसंतराव घनवट.
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी : विजय प्रभाकर गालिंदे
हे वाचलंत का?