

कुन्नुर; पुढारी ऑनलाईन
देशाच्या लष्करी सामर्थ्याला हादरवून सोडणारी घटना आज घडली आहे. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख (सीडीएस) बिपिन रावत जात असलेल्या Mi-17V5 हेलिकॉप्टरचा अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला आहे. दोघांना वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, बिपीन रावत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान कुन्नूर येथे हा अपघात झाला. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य देखील अपघातग्रस्त हवाई दलाच्या या Mi17-V5 हेलिकॉप्टरमध्ये होते. हेलिकॉप्टरमध्ये एकूण नऊ जण होते. घटनास्थळावरून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये हेलिकॉप्टर धुराच्या लोटात जळताना दिसत आहे. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सीडीएस बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, एनके गुरसेवक सिंग, एनके जितेंद्र कुमार, एल/एनके विवेक कुमार, एल/एनके बी साई तेजा, हवालदार सतपाल हे हेलिकॉप्टरमध्ये होते. सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी एका कार्यक्रमात सहभागी होऊन दिल्लीला परतत होते, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर हवाई दलाचे Mi17-V5 हेलिकॉप्टर निलगिरीच्या जंगलात कोसळले. ढिगाऱ्याखालून तीन जणांना बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हा कार्यक्रम वेलिंग्टन, ऊटी येथे आयोजित करण्यात आला होता. तेथे सीडीएस जनरल रावत व्याख्यान देऊन परतत होते. उटी हे वेलिंग्टनमधील सशस्त्र दलांचे महाविद्यालय आहे. सीडीएस आणि त्यांची पत्नी हेलिकॉप्टरमध्ये ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्यासह होते जे सीडीएस यांचे स्टाफ ऑफिसर होते. तसेच दोन पायलटही एकत्र होते. असे सांगितले जात आहे की सीडीएस घेऊन जाणारे विमान किंवा हेलिकॉप्टर उडवण्यासाठी एक विशेष प्रोटोकॉल आहे.
या अपघातामागील कारणाबाबत सर्व प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. खराब हवामान आणि ढगांमुळे हेलिकॉप्टरच्या पायलटचा अचूक अंदाज चुकला आणि त्यामुळे हा अपघात झाला, असे बोलले जात आहे. आता कोर्ट ऑफ इन्क्वायरी होईल, त्यानंतरच अपघात कोणत्या कारणामुळे झाला हे कळेल.
हे ही वाचलं का?