Latest

Vaishali Samant : वैशालीची पहिली निर्मिती असलेलं ‘सांग ना’ गाणं प्रदर्शित

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन : आपल्या सर्वांची आवडती लाडकी गायिका वैशाली सामंत हिने इतकी वर्षे वेगवेगळ्या जॉनर्सची गाणी गायली आहेत. हिंदी, मराठी तसेच इतर कुठल्याही भाषांमध्ये वैशाली सामंत (Vaishali Samant) सहजतेने गाते. गायिकाच नव्हे तर संगीतकार, गीतकार असा तिचा प्रवास उंचावत गेला आहे. आता आणखी एक पाऊल पुढे म्हणजे निर्मिती क्षेत्रात तिने पदार्पण केलं आहे. ते निमित्त म्हणजे टी सिरीज प्रस्तुत "सांग ना…!" (Vaishali Samant)

'टी सिरीज' आणि वैशाली सामंत यांनी मिळून केलेलं हे पहिलं गाणं आहे. या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यात अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर जे दोघंही उत्कृष्ट कलाकार आहेत आणि खऱ्या आयुष्यात ते पती-पत्नी आहेत. ते या गाण्याच्या निमित्तानं पडद्यावर आपल्याला पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

'सांग ना…' या गाण्यात छोटीशी उत्कंठावर्धक कथा आहे. कथा जरी मॅाडर्न ऑफिसमधली असली, तरी त्यातील शब्दरचना रांगड्या भाषेतील आहे.

डिओपी पार्थ चव्हाण यांनी 'सांग ना…'ची सिनेमॅटोग्राफी केली आहे. मनीषा शॅा यांनी प्रोडक्शनची जबाबदारी सांभाळली आहे. अमेय नरे यांनी अतिशय सुरेख म्युझिक अरेंजमेंट केलं आहे. बासरीवादन विजू तांबे यांनी केलं आहे. शॅनेल फरेरा यांनी बॅकींग व्होकल्स गायलं आहे. मिक्सींग अँड मास्टरींग रुपक ठाकूर यांनी, तर सत्यजीत भोसले यांनी संकलन केलं आहे. कॅास्च्युम तन्मय जंगम, हेअर प्रीती गांधी आणि मेकअप अमित सावंत यांनी केला आहे. 'अॅट स्टुडिओ'मध्ये रेकॅार्ड करण्यात आलेल्या या गाण्याचं पोस्ट प्रोडक्शन 'एसटीटी प्रोडक्शन्स'नं केलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT