भारतीय हद्दीत घुसणा-या पाकिस्तानी बोटीला 200 कोटींच्या 40 किलो ड्रग्जसह पकडले, तटरक्षक दल व गुजरात एटीएसची कारवाई | पुढारी

भारतीय हद्दीत घुसणा-या पाकिस्तानी बोटीला 200 कोटींच्या 40 किलो ड्रग्जसह पकडले, तटरक्षक दल व गुजरात एटीएसची कारवाई

पुढारी ऑनलाइन डेस्क : भारतीय पाण्याच्या हद्दीत घुसणा-या एका पाकिस्तानी बोटीला 200 कोटी रुपयांच्या 40 किलो ड्रग्जसह पकडले आहे. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्त रित्या ही कारवाई केली आहे. ICG च्या अधिका-यांनी याबाबत माहिती दिली.

गुजरातमधील जाखौ किनारपट्टीपासून 33 नॉटिकल मैल दूर ही बोट पकडण्यात आली. ही बोट भारतीय पाण्याच्या हद्दीत 6 मैल आत आली होती. यावेळी तटरक्षक दलाच्या दोन वेगवान बोटींनी हल्ला चढवत पाकिस्तानच्या या भारतीय पाण्याच्या हद्दीत घुसणा-या बोटीला पकडले, अशी माहिती ICG च्या अधिका-यांनी दिली.

पुढील तपासासाठी बोटीसह पाकिस्तानी क्रू जखाऊ येथे आणले जात आहेत, अशी माहिती ICG च्या अधिका-यांनी दिली. बातमीचे सविस्तर वृत्त लवकरच…

अहमदाबाद : अरविंद केजरीवाल यांनी केले ऑटोरिक्षा चालकाच्या घरी जेवण, ज्याचे कुटुंब आहे भाजप समर्थक

सिंधुदुर्ग : देवगड बंदरात गुजरातमधील 121 नौका; मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

Back to top button