सांगली : कडेगावमधील लिपिक जाळ्यात; दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सांगली : कडेगावमधील लिपिक जाळ्यात; दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  शेत जमिनीच्या सात-बारा उतार्‍यावरील कूळकायदा कलम 43 शर्त कमी करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणार्‍या कडेगाव तहसील कार्यालयातील अव्वल कारकून सुनील दादासाहेब चव्हाण (वय 49, रा. अण्णाभाऊसाठेनगर, इस्लामपूर) याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी कडेगाव तहसील कार्यालयात ही कारवाई केली.  या कारवाईनंतर कार्यालयात सन्नाटा पसरला होता. रात्री उशिरापर्यंत पथक तिथे तपासात होते. त्यानंतर चव्हाण याच्याविरूद्ध कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार कडेगाव तालुक्यातील आहेत. त्यांनी शेत जमिनीतून ये-जा करण्यासाठी रस्ता मंजूर करून देण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज सादर केला होता. या अर्जावर गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. तसेच शेत जमिनीच्या सात-बारा उतार्‍यावरील कूळकायदा कलम 43 शर्त कमी करण्यासाठी अर्ज दिला होता. या दोन्ही कामांमध्ये मदत करण्यासाठी चव्हाण याने पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. चर्चेअंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले होते. लाचेची रक्कम दिली तर दोन्ही अर्जाचा निकाल तुमच्या बाजूने निकाल लाऊन देतो, असे त्याने सांगितले होते.त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती.  या विभागातील पथकाने तक्रारीची चौकशी केली. त्यावेळी चव्हाण याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. लाचेची रक्कम मंगळवारी देतो, असे तक्रारदाराने सांगितले. तत्पूर्वी पथकाने तहसील कार्यालयाच सापळा लावला. चव्हाण याने लाचेची रक्कम स्वीकारल्याचा 'सिग्नल' मिळताच चव्हाणला रंगेहाथ पकडण्यात आले.

पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अंमलदार अविनाश सागर, सलीम मकानदार, सीमा माने, संजय संकपाळ, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, भास्कर भोरे, श्रीपती देशपांडे, रवींद्र धुमाळ,, संजय कलगुटगी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दुसर्‍यांदा लाचप्रकरणी सापडला!

चव्हाण हा 2020 मध्ये वाळवा येथे मंडल अधिकारी होता. वाळव्यातील एका तक्रारदाराच्या आज्जीचे निधन झाले होते. आज्जीच्या मृत्यूपत्रकाची शेत जमीन व घर जागेच्या सात-बारा उतार्‍यावर नोंद करून देण्यासाठी चव्हाणने 70 हजारांच्या लाचेची मागणी केली. चर्चेअंती 30 हजार देण्यास सांगितले. गोटखिंडी (ता. वाळवा) येथे त्याचा पंटर अमर वाघमारे याला लाचेची रक्कम स्वीकारण्यास सांगितले होते. त्यावेळी चव्हाणला अटक करण्यात आली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news