Latest

Shopian Encounter : शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : शोपियांच्या अलशिपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. काश्मीर पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या : 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना लष्करचे मोरीफत मकबूल आणि जाजिम फारुक उर्फ ​​अबरार अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्या हत्येत दहशतवादी अबरारचा हात होता.

याआधी बुधवारी सुरक्षा दलांनी कुलगाम जिल्ह्यातील कुज्जर भागात एका घरात लपलेल्या दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. बासित अमीन भट आणि फैसल साकिब अहमद लोन अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. दोघेही स्थानिक हावुरा भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.

त्याचवेळी, बुधवारी संध्याकाळी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील वात्रीगम वनिहामा भागात अज्ञात दहशतवाद्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यावर गोळ्या झाडल्या. विद्यार्थ्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. साहिल बशीर असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो वत्रीगामचा रहिवासी आहे. साहिलचा गुरुवारी रुग्णालयात मृत्यू झाला. गोळी त्यांच्या मानेला लागली होती.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT