Solar Eclipse 2023 : कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही : प्रा. सुरेश चोपणे | पुढारी

Solar Eclipse 2023 : कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही : प्रा. सुरेश चोपणे

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा: जगातील उत्तर-मध्य आणि दक्षिण अमेरिका, अमेरिका, मेक्सिको, कोलंबिया आणि ब्राझील येथे दि. १४ ऑक्टोबररोजी ग्रहण कुठे कंकणाकृती किंवा खग्रास असे दिसणार आहे. परंतु, हे ग्रहण भारतातून दिसणार नाही, अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी ‘दै. पुढारी’ बोलताना दिली. (Solar Eclipse 2023)

भारतीय वेळेनुसार हे ग्रहण सकाळी 8.33 वा सुरू होऊन 2.26 वाजता संपेल. हे ह्या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण असेल. यापूर्वी 20 एप्रिलरोजी आंशिक सूर्यग्रहण घडले होते. या वर्षीचे  28 ऑक्टोबर रोजी रात्री घडणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारत, महाराष्ट्रातून दिसेल. यापूर्वी 5 मेरोजी छायाकल्प चंद्रग्रहण झाले होते. 28 ऑक्टोबरचे ग्रहण वर्षातील शेवटचे ग्रहण असेल. हे ग्रहण जगातील युरोप, आशिया, आष्ट्रेलिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतून दिसेल. ग्रहणाची सुरवात रात्री 01.05 मिनिटाने सुरुवात होईल, ग्रहण मध्य 01.44 तर ग्रहण 2.22 वाजता संपेल. आंशिक ग्रहणाचा चंद्र केवळ 10 टक्के झाकला जाईल.

Solar Eclipse 2023 : ऑक्टोबरचा उल्कावर्षाव

9 ऑक्टोबरला ड्राकोनिड उल्कावर्षाव, 18 ऑक्टोबरला जेमिनिड उल्कावर्षाव, 22 ऑक्टोबरला ओरिओनीड उल्कावर्षाव, 25 ऑक्टोबरला लिओनीड उल्कावर्षाव पाहावयास मिळणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात अनेक खगोलीय घटना पाहण्याची ही संधी अनेक वर्षांनंतर चालून आली आहे. खगोल अभ्यासकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.

हेही वाचा 

Back to top button