

पुञारी ऑनलाईन डेस्क : हमासने केलेल्या हल्ल्यानंतर आता इस्त्रायल आक्रमक झाले आहे. इस्त्रायलच्या सुरक्षामंत्रालयाकडून आज (दि. ९) गाझा पट्टी संपूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर याठिकाणी खाद्यपदार्थ आणि इंधनावर निर्बंध आणले आहेत.
हमासने हल्ला केल्यानंतर इस्त्रायलने गाझा पट्टीच्या सर्व परिसरातील वीज पुरवठा बंद केला होता, यामुळे गाझाचा सर्व परिसर काळोखात होता. आता इस्त्रायलने खाद्यपदार्थ, इंधनावर देखील निर्बंध आणलेले आहेत. इस्रायलच्या सुरक्षामंत्रालयाकडून आज (9 ऑक्टोबर) सांगण्यात आले आहे की, ते गाझावर "संपूर्ण नाकेबंदी" लादणार आहे.
इस्रायल आणि हमासच्या अतिरेक्यांमधील तीन दिवसांच्या संघर्षानंतर आजची मोठी अपडेट आहे. या संघर्षामध्ये दोन्ही बाजूंचे 1,100 हून अधिक लोक ठार झाले, तर इस्रायलने 44 सैनिकांसह 700 हून अधिक ठार केले आहेत.
हेही वाचा