Latest

डिझेल दरात सलग दुसर्‍या दिवशी वाढ

नंदू लटके

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवाः जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दराने उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून सलग दुसर्‍या दिवशी डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली.

एकीकडे डिझेल दरात 25 पैशांची वाढ करीत असताना दुसरीकडे तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर मात्र जैसे थे ठेवले आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर तीन वर्षाच्या उच्चांकी स्तरावर म्हणजे 78 डॉलर्स प्रतिबॅरलवर पोहोचले आहेत.

गेल्या आठवड्यापासून डिझेल दरात वाढ

पेट्रोलियम पदार्थांचे दर सुमारे तीन आठवडे स्थिर ठेवल्यानंतर तेल कंपन्यांनी गेल्या आठवड्यापासून डिझेल दरात वाढ करण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार आता तिसर्‍यांदा डिझेलचे दर वाढविण्यात आले आहेत.

ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीतले डिझेलचे प्रति लिटरचे दर 89.32 रुपयांवर गेले आहेत.

मुंबईत हेच दर 96.94 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे दोन्ही शहरांत पेट्रोलचे दर क्रमशः 101.19 आणि 107.26 रुपयांवर स्थिर आहेत.

चेन्नई आणि कोलकाता येथे डिझेलचे दर क्रमशः 94.08 आणि 92.42 रुपयांवर गेले आहेत.

जागतिक बाजारात क्रूड तेलाचे दर आणखी वाढले तर पेट्रोलच्या दरातही वाढ केली जाऊ शकते, असे संकेत तेल कंपन्यांकडून देण्यात आले आहेत.

हेही वाचलं का ? 

SCROLL FOR NEXT