बीजिंग : (virus in bats) कोरोना महामारीमुळे अवघे जगच विषाणूंबाबत अधिक सावध झाले आहे. याबाबत सातत्याने नवे नवे संशोधन होत असते. वटवाघळासारख्या काही जीवांमध्ये विषाणू मोठ्या संख्येने असतात. आता संशोधकांना चीनमधील वटवाघळांमध्ये नवीन विषाणू सापडला आहे. हा विषाणू कोरोनासद़ृश असल्याचा दावा शास्त्रज्ञांकडून करण्यात आला आहे.
हा विषाणू कोरोनासारखाच माणसांमध्ये पसरू शकतो. तसेच तो कोरोना इतकाच घातक असल्याचे देखील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे आता ही नवी माहिती जगासाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे. याबाबत एका ब्रिटिश वृत्तपत्रात माहिती देण्यात आली आहे. या दाव्यानुसार म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या चीनच्या युनान प्रांतात चिनी आणि ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी 149 (Deadly virus in bats) वटवाघळांचे नमुने घेतले.
या नमुन्यांच्या अभ्यासामध्ये त्यात पाच विषाणू आढळून आले आहेत. हे विषाणू मानव आणि प्राण्यांसाठी धोकादायक असून, ते कोरोना विषाणूप्रमाणेच (Deadly virus in bats) रोग पसरवू शकतात असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या विषाणूंमध्ये इींडध2 नावाचा विषाणू हा डअठड- उेत-2 शी संबंधित आहे. याच विषाणूमुळे जगभरात कोरोनासारख्या गंभीर आजाराचा फैलाव झाला होता.
कोरोनासारखे विषाणू (Deadly virus in bats) अजूनही चिनी वटवाघळांमध्ये फिरत आहेत. त्यामुळे कोरोनासारखा किंवा त्याच्यापेक्षाही भयंकर एखादा आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी भीती याबाबत बोलताना सिडनी विद्यापीठातील उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ प्रोफेसर एडी होम्स यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :