Latest

ड्रोन वापरणार आहात तर मग हा नकाशा पाहा…

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत सरकारने एक नकाशा जारी केला आहे. हा नकाशा ड्रोनचा आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने 'भारताचा हवाई क्षेत्र नकाशा' तयार केला आहे. खासगी ड्रोन कोणत्या क्षेत्रात उडवले जाऊ शकतात. कुठे उडवले जाऊ शकत नाहीत. आणि काही निर्बंधांसह ते कुठे उडवता येईल, 'मॅप माय इंडिया' आणि 'हॅपियस्ट माइंड' या आयटी सर्विस कंपनीने मिळून हा नकाशा तयार केला आहे. यानंतर या नकाशाला नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) परवानगीही मिळाली आहे. आता तो देशभरात लागू करण्यात आला आहे.

रेड, येलो, ग्रीन झोन

या नकाशामध्ये पूर्ण देशातील हवाई क्षेत्राला रेड, येलो आणि ग्रीन झोनमध्ये विभागले आहे.

ग्रीन झोन मध्ये ४०० फुटांपर्यंत आणि कोणत्याही ऑपरेशन विमानतळाच्या ८ ते १२ कि.मी. हद्दी दरम्यान ड्रोनला २०० फुटांपर्यंत उड्डाणासाठी परवानगीची गरज नाही.

ग्रीन झोनमध्ये ५०० किलोग्रॅमपर्यंत वजनाच्या ड्रोन ४०० फुट उंचीपर्यंत उड्डाणासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही.

जर ऑपरेशनल एअरपोर्टच्या ८ ते १२ कि.मी.च्या झोनमध्ये ड्रोन २०० फुटांवरून चालवायचे असेल तर ते येलो झोनमध्ये येईल.

येलो झोनमधील ड्रोन ऑपरेशनसाठी संबंधित हवाई वाहतूक नियंत्रण प्राधिकरणाकडून परवानगी आवश्यक आहे. जसे एएआय, आयएएफ, नेव्ही, एचएएल आदींची परवानगी आवश्यक आहे.

याशिवाय रेड झोनचा अर्थ नो ड्रोन झोन. या क्षेत्रात केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय ड्रोन चालवता येणार नाही.

नकाशा कुठे मिळेल?

ड्रोन उडवण्यासाठी ग्रीन, येलो, रेड झोन कुठे आहे, याची माहिती मिळवण्यासाठी नकाशा तुम्हाला DGCAच्या डिजिटल प्लॅटफॉर्म 'डिजिटल स्काय' (Digital Sky) वर पाहता येईल. जर तुम्ही हा नकाशा पाहणार असाल तर https://digitalsky.dgca.gov.in/home या लिंकवर पाहू शकता.

या लिंकवर तुम्हाला अशी विंडो दिसेल.

या पेजवर गेल्यानंतर Interactive Airspace Map यावर क्लिक करा. यावर नकाशा दिसेल.

या पेजवर तुम्हाला उजव्या बाजूला एक आयकॉन दिसेल. वरती फोटो लावला आहे, यात आयकॉन जपानच्या वरती दिसत आहे. या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर व्हिज्युअलायझेशनचा ऑप्शन दिसेल.

आता झूम इन करा आणि राज्य आणि शहराचा नकाशा पहा. जिथे तुम्हाला ड्रोन ऑपरेट करण्याचे स्टेटस जाणून घ्यायचे आहे. तसेच, व्हिज्युअलायझेशनसह स्तंभातून, ज्या क्षेत्राबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे आहे ते निवडा.

सरकारतर्फे सांगितले आहे की, जे लोक ड्रोन ऑपरेट करण्यास इच्छुक आहेत. ते हा नकाशा पाहूनच करु शकतात. हे सगळ्यांसाठी सोप आहे. यासाठी यावर पासवर्ड किंवा लॉगिन सारखे काही ठेवलेले नाही. याला वेळोवेळी अपडेट केले जाईल.

हेही वाचलत का :

कोल्हापूरातला २१ दिवसांचा पेढा गणपती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT