पुढारी ऑनलाईन डेस्क: सियाचीनमध्ये १६ वर्षांपूर्वी दरीत कोसळल्याने मृत्यू झालेल्या सैन्यदलातील जवानाचा मृतदेह नुकताच सापडला. या जवानाच्या मुलीने आपल्या पित्याचा पहिल्यांदाच पाहिला. आयुष्यात कधीच न झालेली भेट अंतिम क्षणी १६ वर्षांनी झाल्याने मुलीसह नातेवाईकांनी हंबरडा फोडला.
सियाचीन हे नाव ऐकले तरी आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते बर्फाचे कातीव कडे, कातडी सोलणारा हिमकण वाहून देणारा वारा अशा प्रतिकूल परिस्थिीत आपले जवान तेथे सातत्याने पाहरा देतात.
मात्र, दुर्दैवाने एखाद्याचा तेथे मृत्यू झाला तर अनेकदा मृतदेहही मिळत नाही. अशाच एका दुर्दैवी जवानाचा मृतदेह तब्बल १६ वर्षांनी सापडला.
उत्तरप्रदेशातील मुरादनगर येथील बिहार रेजिमेंटमधील जवान अमरिश त्यागी या जवानाचा सियाचीनमधून परतत असताना दरीत कोसळून मृत्यू झाला होता.
त्यांच्यासोबत चार जवान दरीत कोसळले होते. यापैकी तीन जवानांचे मृतदेह हाती लागले होते. मात्र, अमरिश यांचा मृतदेह सापडला नव्हता.
अमरिश शहीद झाले त्यावेळी त्यांची पत्नी गर्भवती होती. दरम्यान त्यांना मुलगी झाली. या मुलीने आपल्या वडिलांचा चेहरा केवळ फोटोत पाहिला होता.
अमरिश यांचा मृतदेह बर्फात गाडला गेला होता. बर्फ वितळल्यानंतर मृतदेह उघडा पडला.
त्यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या साहित्यावरून त्यांची ओळख पटली. ही घटना समजताच त्यांच्या मूळगावी शोककळा पसरली.
अमरिश यांची मुलगी १६ वर्षांची असून आपल्या पित्याचा मृतदेह पाहताच ती काही काळ एकटक पाहत बसली.
तिने प्रथमच आपल्या पित्याचा चेहरा पहिला होता.
जेव्हा अमरिश यांचे पार्थिव त्यांच्या गावी आणले तेव्हा १६ वर्षे वाट पाहत बसलेल्या पत्नीलाही शोक अनावर झाला.
मंगळवारी बिहार रेजिमेंटचे जवान अमरीश त्यागी यांचे पार्थिव घेऊन त्यांच्या गावी दाखल झाले.
१६ वर्षांपूर्वी 23 ऑक्टोबरला सियाचीनहून परतत असताना उत्तराखंडच्या हरशील येथील दरीत ते कोसळले होते.
गेल्या आठवड्यात तेथे बर्फ वितळल्यामुळे एक मृतदेह जवानांना दिसला.
हेही वाचा :