Latest

केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे ट्विटर हँडल हॅक

स्वालिया न. शिकलगार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – दिल्ली एम्सच्या सर्व्हरनंतर आता गुरुवारी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे ट्विटर हँडल हॅक करण्यात आले. गुरुवारी सकाळी हॅकर्सनी मंत्रालयाचे ट्विटर हँडल हॅक केले. सुरक्षा एजन्सी आणि सायबर तज्ज्ञांनी ट्विटर हँडल हॅकिंगशी संबंधित प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

यापुर्वी दिल्ली एम्सच्या सर्व्हरवरही सायबर हल्ला झाला होता. त्यानंतर हॅकर्सनी संस्थेकडून क्रिप्टोकरन्सीमध्ये २०० कोटी रुपयांची मागणी केली. मात्र, पोलिसांनी याचा इन्कार केला असून सर्व्हर बंद पडल्याने रुग्ण व कर्मचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. बरेच दिवस सगळे काम हाताने चालले होते.

मंत्रालयाच्या हँडलवरील मूळ ट्विटमध्ये अनेक अनोळखी खात्यांना टॅग केले गेले आणि त्यानंतरच्या ट्विटमध्ये त्याच पद्धतीचे अनुसरण केले गेले. मात्र, काही वेळातच अकाऊंट रिस्टोअर करण्यात आले आणि शंकास्पद ट्विट काढून टाकण्यात आले. सुरक्षा एजन्सी आणि सायबर तज्ज्ञ आता या घटनेचा तपास करत आहेत.

SCROLL FOR NEXT