Latest

Bhavana Gawali : शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीकडून समन्स

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या निकटवर्तीय असलेल्या सईद खान याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी रात्री अटक केली होती. आता ईडीने भावना गवळी यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. ईडीने गवळी यांना 4 ऑक्टोबर रोजी चौकशीला बोलावले आहे.

वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्याशी संबंधित 72 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडी तपास करत आहे. ईडीने भावना गवळी यांच्या वाशीम व यवतमाळ येथील काही संस्था, घर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय सईद खान यांच्यासह लेखापाल हकीम शेख, मोहम्मद अतहर, फारुख जौहर आणि एका वकिलाला चौकशीला बोलावले होते.

त्यानुसार ईडीने खान यांच्याकडे चौकशी करुन सोमवारी रात्री त्याला अटक केली आहे. न्यायालयाने खान याला 1 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

खासदार गवळी यांच्याशी संबंधित महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे संचालक आणि गवळी यांचे आर्थिक व्यवहार सांभाळत असलेल्या खान यांच्याकडे कोठडीमध्ये कसून चौकशी सुरु आहे. आता ईडीने भावना गवळी यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बाजवले आहे. भावना गवळी या ईडी चौकशीला सामोऱ्या जातात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : #UPSCResult : ऑडिओ ऐकून केला अभ्यास | अल्पदृष्टी असणारा आनंद पाटील देशात 325 वा

SCROLL FOR NEXT