Latest

काँग्रेसचा मोर्चा आता अशोक गेहलोत यांच्याकडे; ओएसडीचा राजीनामा

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर आता काँग्रेसने आपला मोर्चा राजस्थानच्या अशोक गेहलोत यांच्याकडे वळविला आहे.

सचिन पायलट आणि गेहलोत यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत असताना आता तेथेही नेतृत्वबदलाचे वारे वाहू लागले आहे. गेहलोत यांचे ओएसडी लोकेश शर्मा यांनी राजीनामा दिला असून मध्यरात्री घडलेल्या या घडामोडीमुळे चर्चेला वेग आला आहे.

शर्मा यांनी शनिवारी रात्री साडेबारा वाजता आपला राजीनामा गेहलोत यांना सोपविला आहे.

त्यांनी राजीनामा देण्याआधी एक ट्विट केले हाोते. त्यात लिहिले आहे. 'मजबूत को मजबूर, मामूली को मगरूर किया जाए…। बाड़ ही खेत को खाए, उस फसल को कौन बचाए..'

या ट्विटला राजकीय रंग दिला जात आहे असे लोकेश शर्मा यांनी म्हटले आहे. पंजाबमधील राजकारणाशी त्याला जोडले जात आहे. हे चुकीचे आहे.

त्यांनी दिलेल्या राजीमाना पत्रात म्हटले आहे, मी २०१० पासून ट्विटरवर सक्रीय आहे. आजपर्यंत मी पार्टीच्या विचारधारेवरच चालत आलो आहे.

मी आजपर्यंत असा एकही चुकीचा शब्द लिहिला नाही की जो चूक असेल. मला माझ्या मर्यादा माहीत आहेत.

त्या लक्षात ठेवून मी कुठलेही राजकीय ट्विट केले नाही. तरीही मी काही जाणीवपूर्वक चूक केली आहे,

असे वाटत असेल तर मी राजीनामा पाठवत आहे. निर्णय तुम्हाला करायचा आहे.

राजस्थानचे राजकारण गरम

गेल्या काही दिवसांपासून राजस्थानात सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात मोठा राजकीय संघर्ष सुरू आहे.

पायलट पक्ष सोडतील असे वाटत असताना पंजाबमधील नवज्योत सिद्धूसारखे तेही काँग्रेसमध्ये एकाकी पडूनही सक्रीय आहेत.

गेहलोत यांना त्यांच्याशी जुळवून घेण्यास सांगूनही ते पायलट यांना जवळ करत नाहीत. त्यामुळे पायलट गट अस्वस्थ आहे.

प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी ज्याप्रकारे पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांना बदलले ते पाहता गेहलोत यांची खुर्चीही हलू शकते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT