Latest

Amol Mitkari Vs Yogi Adityanath : राज्याला उर्फीमध्ये अडकवून, योगी बर्फी घेऊन गेले : अमोल मिटकरी

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकीकडे देश-विदेशातून नवी गुंतवणूक आणि प्रकल्प आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोनच दिवसांच्या मुंबई दौर्‍यातून तब्बल 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमोल मिटकरी यांनी " राज्याला उर्फीमध्ये अडकवून, योगी महाराष्ट्रात येऊन बर्फी घेऊन गेले." असं खोचक ट्विट केले आहे. (Amol Mitkari Vs Yogi Adityanath)

मुख्यमंत्री योगी बुधवारी रात्री मुंबईत दाखल झाले. उत्तर प्रदेशच्या स्थलांतरीत नागरिकांशी त्यांनी संवाद साधला आणि रोड शो केला. योगी यांनी विविध उद्योजक आणि बॉलीवूडच्या निर्मार्त्यांच्या भेटी घेत पाच लाख कोटींची गुंतवणूक मिळवली. मुकेश अंबानी यांचा रिलायन्स समूह, गौतम अदानी यांचा अदानी समूह, टाटा, पिरामल, गोदरेज, वेदांत, पार्ले, हिंदुजा, लोढा यांच्यासह 24 हून अधिक उद्योगपतींनी योगी यांची भेट घेतली. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमोल मिटकरी यांनी "राज्याला उर्फीमध्ये अडकवून, योगी महाराष्ट्रात येऊन बर्फी घेऊन गेले." असं खोचक ट्विट केले आहे. तर या ट्विटमध्ये त्यांनी 'योगी तेरा खेल निराला' असा हॅशटॅग दिला आहे.

Amol Mitkari Vs Yogi Adityanath : काय आहे उर्फी प्रकरण

आपल्या हटके फॅशनमूळे नेहमी चर्चेत असते. गेले काही दिवस ती खूप चर्चेत आहे. कारण भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी तिच्या सार्वजनिक ठिकाणावरील पेहरावावर टिका करत. मुंबई पोलिसांना अटक करण्यास सांगितले होते. तसेच महिला आयोगाकडे तिच्यावर कारवाई करण्यास सांगितले होते. चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात सोशल मीडियावरील वॉर सुरु आहे. त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही एक ट्विट करत या वादात उडी घेतली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT