Russia Ukraine war update : रशियाची युद्धबंदीची घोषणा म्हणजे “ढोंगी प्रचार” – युक्रेन अध्यक्ष झेलेन्स्की | पुढारी

Russia Ukraine war update : रशियाची युद्धबंदीची घोषणा म्हणजे "ढोंगी प्रचार" - युक्रेन अध्यक्ष झेलेन्स्की

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाने “व्याप्त केलेले प्रदेश सोडले पाहिजेत तरच त्याला ‘तात्पुरती युद्धबंदी’ मिळेल.हा ढोंगीपणा स्वतःकडे ठेवा. अशा आशयाचं ट्विट करत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार मायखाइलो पोडोल्याक यांनी क्रेमलिनच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आहे.  वाचा सविस्तर बातमी. (Russia Ukraine war update )

जवळपास 11 महिन्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाबाबत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी (दि.५) मोठी घोषणा केली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गुरुवारी (दि.५) युक्रेनमध्ये ६ ते ७ जानेवारी दरम्यान युद्धविराम करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजेच या काळात युद्ध थांबवले जाईल. रशियाचे ऑर्थोडॉक्स बिशप 76 वर्षीय पॅट्रिआर्क किरिल यांनी ऑर्थोडॉक्स ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर 6-7 जानेवारी रोजी युक्रेनमध्ये युद्धविराम करण्याची विनंती केली होती. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशिया-युक्रेन युद्धाला सुरू केल्यानंतर रशियाने युक्रेनमध्ये पूर्ण युद्धविराम आणण्याची ही पहिलीच वेळ आहे. क्रेमलिन यांनी आपल्या एका निवेदनात म्हटले आहे, ” मी रशियन फेडरेशनच्या संरक्षण मंत्र्यांना 6 जानेवारी 2023 रोजी रात्री 12:00 (0900 GMT) पासून 7 जानेवारी 2023 रोजी 24:00 (2100 GMT) पर्यंत दोन्ही बाजूंमधील संपूर्ण संपर्क रेषेसह युद्धविराम करण्याची सूचना देतो.”

Russia Ukraine war update : व्याप्त केलेले प्रदेश सोडले पाहिजेत

क्रेमलिनच्या घोषणेनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे सर्वोच्च सल्लागार मायखाइलो पोडोल्याक यांनी ट्विट करत या निर्णयाला “ढोंगी प्रचार” असं म्हंटलं आहे. रशियाने “व्याप्त केलेले प्रदेश सोडले पाहिजेत तरच त्याला ‘तात्पुरती युद्धबंदी’ मिळेल.” त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की,” युक्रेन परदेशी प्रदेशावर कधीही पहिले हल्ला करत नाही आणि नागरिकांना मारत नाही. जसे आरएफ करते. युक्रेनने आपल्या हद्दीतील केवळ व्यापलेल्या सैन्याच्या सदस्यांचा नाश केला. दुसरे. आरएफने व्यापलेले प्रदेश सोडले पाहिजेत तरच त्याच्याकडे “तात्पुरती युद्धविराम” असेल. दांभिकता स्वतःकडे ठेवा”

हेही वाचा

Back to top button