उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वादात अंजली दमानियांची उडी (पाहा व्हिडिओ) | पुढारी

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वादात अंजली दमानियांची उडी (पाहा व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील सोशल मीडिया युद्ध चांगलंच पेटलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही एक ट्विट करत या वादात उडी घेतली आहे. दमानिया यांनी भाजप खासदाराच्या एका महासभेतील व्हीडिओ रिट्विट करत वाघ यांना सवाल केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ उर्फीच्या कपड्यांवरून तिच्यावर सातत्याने टीका करत आहेत. उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यातील वादात अनेक राजकीय नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अंजली दमानिया यांनी दिल्लीतील भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांच्या जन आक्रोश महासभेतील व्हिडिओ रिट्विट केला आहे.

या व्हिडिओमध्ये एक महिला ‘तशा प्रकारचे’ नृत्य करत असल्याचे दिसून येत आहे. यावरून दमानिया यांनी चित्रा वाघ यांना सवाल केले आहेत. भाजपच्या रमेश बिधुरी यांची ही जन आक्रोश महासभा आहे. या बद्दल आपले काय मत आहे? याला आपण कुठली संस्कृती म्हणाल? याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल का? असा प्रश्न त्यांनी केला आहे.

हेही वाचा :

Back to top button