पुढारी ऑनलाइन डेस्क : पुण्यातील वाकड येथे अवघ्या 6 व्या महिन्यात म्हणजेच 24 आठवड्यात जन्मलेली शिवन्या ही भारतातील अकाली जन्माला आलेल्या बाळांमध्ये सर्वात लहान बाळ आहे. तसेच ती तिच्या घरी आनंदाने हळूहळू तिच्या वाढीचे निर्देशांक गाठत आहे, असे वर्णन पुण्यातील सूर्या मदर अँड चाइल्ड केअर रुग्णालयाचे मुख्य निओनॅटोलॉजिस्ट डॉ. सचिन शाह यांनी म्हटले आहे. तसेच प्रतिकूल परिस्थितीत मात करत जगणारी शिवन्या रेकॉर्ड ठरू शकते, असे म्हटले आहे. (Premature Birth)
सर्वसामान्यपणे गर्भधारणेनंतर बाळाच्या प्रसुतीचा काळ हा 9 महिन्यांपर्यंतचा असतो. मात्र, अनेकदा वेगवेगळ्या कारणास्तव कालावधीपूर्वीच अकाली प्रसूती होऊन आठव्या महिन्यात किंवा सातव्या महिन्यात जन्म होतो. तेव्हा अशा बाळांना अकाली जन्मलेली बाळं म्हणतात. अकाली जन्मलेले बाळ हे अन्य मुलांप्रमाणे खूप नाजूक असते. तसेच अनेक असे बाळ जास्त दिवस जगत नाही. त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण जास्त असते. साधारणपणे 7 व्या, 8व्या महिन्यात झालेली अकाली प्रसूतीची अनेक उदाहरणे सापडतात. मात्र, 6 व्या महिन्यात प्रसुती होणे हे दूर्मिळ असते. (Premature Birth)
पुण्यात जन्मलेली 'शिवन्या' ही अशाच प्रकारे फक्त 24 व्या आठवड्यात 6 व्या महिन्यात अवघ्या 400 ग्राम वजनाची जन्मलेली आतापर्यंतची भारतात अकाली जन्माला आलेल्या बाळांमध्ये वय आणि वजन दोन्ही बाबतीत सर्वात लहान ठरली आहे. आतापर्यंत भारतात अशा प्रकारची नोंद कुठेही झालेली नाही, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
शिवन्या गेल्या वर्षी 21 मे रोजी जन्मल्यानंतर तिला 94 दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. 23 ऑगस्ट रोजी तिला डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी तिचे वजन 2130 ग्रॅम इतके होते. अशा बाळांमध्ये जगण्याचा दर 0.5% इतका कमी आहे. गर्भधारणेच्या सामान्य 37-40 आठवड्यांनंतर जन्मलेल्या बाळांचे वजन किमान 2,500 ग्रॅम असते. (Premature Birth)
शिवन्याबाबत तिच्या वडिलांनी म्हटले आहे, "ती आता इतर निरोगी नवजात मुलांसारखीच आहे. तिचे वजन 4.5 किलो आहे आणि तिचे चांगले पोषण होत आहे.
तज्ज्ञांच्या मते शिवन्याचे चांगले आरोग्य तिच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आणि भारतातील नवजात शिशुंच्या काळजीमुळे आहे.
तिचा अकाली जन्म तिच्या आईच्या जन्मजात विकृतीचा परिणाम होता, ज्याला दुहेरी गर्भाशय (बायकॉर्न्युएट) म्हणतात. जेव्हा स्त्रीच्या गर्भाशयात दोन स्वतंत्र पाउच असतात आणि दोन पाउचपैकी एक दुसऱ्यापेक्षा लहान असतो. एक गर्भ म्हणून, शिवन्या लहान वयात वाढली, ज्यामुळे तिचा जन्म अवघ्या 24 आठवड्यात झाला.(Premature Birth)
तज्ञांच्या मते, "मायक्रो-प्रीमीज" किंवा अकाली जन्मलेली बाळं – विशेषतः ज्यांचे वजन 750gm पेक्षा कमी आहे ते अत्यंत नाजूक असतात आणि त्यांची काळजी अत्यंत निर्जंतुक आणि गर्भासारखी वातावरणात घ्यावी लागते.
यापूर्वी अमेरिकेत एक 5 महिन्यात जन्माला आलेल्या आणि जीवंत राहिलेल्या बाळाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. ती जुळी मुले होती. त्यातील एकजण मृत पावले होते. तर दुसरे बाळ हे जीवंत राहून वाढले आहे.(Premature Birth)
हे ही वाचा :