Latest

BBM-3 : दुसऱ्या लग्नाच्या कहाण्या सांगू नकोस, काम्या पंजाबीने स्नेहा वाघला फटकारलं

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन : 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होताचं राडा सुरू झालाय, या शोने सर्वांच लक्ष वेधलंय. शो सुरू होऊन दोन दिवस झाले. पण, असा काही ड्रामा सुरु झालाय. ते शो पाहिल्यानंतरचं तुम्हाला समजणार आहे. यामध्ये काम्या पंजाबी स्नेहा वाघवर भडकलीय. पहिल्या लग्नाचं माहित नाही. पण, दुसऱ्या लग्नाच्या कहाण्या सांगू नकोस. असं म्हणत काम्या पंजाबी हिने स्नेहाला फटकारलंय.

काम्या पंजाबी

या शोमध्ये स्नेहा वाघ स्पर्धक म्हणून सहभागी झाली. पण, तिचा पहिला पती अविष्कार दार्वेकरने शोमध्ये एन्ट्री घेतल्यानंतर स्नेहाची रिॲक्शन पाहण्यासारखी होती. तिला आता पहिल्या पतीबरोबर या बिग बॉसच्या घरात राहावं लागणार आहे. एकाच घरात, एकाच छताखाली असल्यामुळे कोणता नवा ड्राम पाहायला मिळतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

काम्या पंजाबी

स्नेहाने शोमध्ये एन्ट्री घेतल्यानंतर आपल्या वैवाहिक जीवनाचा खुलासा केला. तिने १९व्या वर्षी अभिनेता अविष्कार दार्वेकरशी लग्न केल्याचं सांगितलं. पण, काही काळानंतर ते वेगळे झाल्याचे त्यांनी म्हटले. पुन्हा दुसरं लग्न केलं पण, तेही टिकलं नाही.

स्नेहा वाघ

शोमध्ये तिने तिचे दोन्ही लग्न अपयशी झाल्याचे सांगितले. तिने यामागील कारणदेखील सांगितलं. स्नेहाने २०१५ साली दुसरं लग्न केलं.

स्नेहा वाघ

अनुराग सोळंकी या व्यक्तीसोबतचा तिचा संसारदेखील फार काळ टिकू शकला नाही. लग्नाच्या आठ महिन्यानंतर ते दोघेही वेगळे झाले. अनुरागदेखील स्नेहाचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचं तिने म्‍हटलं हाेते. मात्र, यानंतर अभिनेत्री पंजाबीने स्नेहावर निशाणा साधला.

स्नेहा वाघ

पंजाबीने ट्विट केलं. यामध्ये ती म्हणाली, "तुला बिग बॉसच्या घरात यायचं होतं चांगली गोष्ट आहे. तू आलीस देखील. मात्र व्हिक्टिम कार्ड कशाला खेळते. तुझ्या पहिल्या लग्नाबद्दल माहित नाही. मात्र दुसऱ्या लग्नाबद्दल काहीही कहाण्या नको सांगूस. तेही या चार दिवसांच्या गेमसाठी. तुला चांगलं माहितेय मी सत्य बाहेर आणू शकते. अशा वाईट पद्धतीने खेळू नकोस."

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT