श्रीनगर  
Latest

श्रीनगर : सौरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

स्वालिया न. शिकलगार

श्रीनगर : पुढारी ऑनलाईन

श्रीनगरच्या सौरा या ठिकाणी लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यांच्याकडून एके-४७ जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची ओळख शाकीर अहमद वाजा आणि आफरीन आफताब मलिक अशी आहे. दोघेही ट्रेंज शोपियानचे रहिवासी आहेत. दरम्यान, आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितले की, काश्मीर खोऱ्यात तीन दिवसांत दहा दहशतवादी मारले गेले आहेत.

काश्मीरमध्ये टीव्ही अभिनेत्री अमरीन भटच्या मृत्यूचा बदला सुरक्षा दलांनी घेतला आहे. काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाच्या १० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. स्वतः आयजीपी काश्मीर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'टीव्ही अभिनेत्री अमरीन भटच्या निर्घृण हत्येचा २४ तासांत उलगडा झाला. काश्मीर खोऱ्यात तीन दिवसांत जैश-ए-मोहम्मदच्या ३ आणि लष्कर-ए-तैयबाच्या ७ दहशतवाद्यांसह १० दहशतवादी मारले गेले आहेत.

गुरुवारी, जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना घेरण्यात आले होते, ज्यांनी बुधवारी एका महिला टीव्ही कलाकाराची हत्या केली होती. पोलीस महानिरीक्षक (काश्मीर झोन) विजय कुमार यांनी ट्विट केले होते की, "दिवंगत कलाकार अमरीन भट (एलईटीचे दहशतवादी) यांचे दोन्ही मारेकरी अवंतीपोरा चकमकीत पकडले गेले आहेत.."

मरीन भट या टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टारची बुधवारी बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि तिचा १० वर्षांचा पुतण्या या हल्ल्यात जखमी झाला. यापूर्वी, पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील अगन हांजीपुरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती.

हेदेखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT