संभाजीराजे आज भूमिका जाहीर करणार | पुढारी

संभाजीराजे आज भूमिका जाहीर करणार

कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे हे शुक्रवारी (दि. 27) मुंबईत आपली भूमिका जाहीर करणार आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघात सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत ते आपली पुढील वाटचालीविषयी दिशा स्पष्ट करतील. संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठविण्यासाठी शिवसेनेने शिवबंधन बांधण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला होता. त्यासाठी त्यांना सोमवारी (दि. 23) दुपारी बारा वाजेपर्यंत निर्णय घेण्यास सांगितले होते.

मात्र, याकाळात संभाजीराजे यांनी याबाबतचा निर्णय न घेतल्याने संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी पवार यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे कोणती भूमिका घेतात, त्याकडे लक्ष लागले आहे.

याबाबतचा निर्णय न घेतल्याने संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी पवार यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे कोणती भूमिका घेतात, त्याकडे लक्ष लागले आहे.

भावनिक पोस्ट व्हायरल 

संभाजीराजे यांनी इन्स्टाग्राम व ट्विटरवरून एक भावनिक पोस्ट व्हायरल केली आहे. त्यामध्ये कोल्हापूरच्या मध्यवर्ती शिवाजी चौक येथील शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करताना ‘तुमच्या नजरेतील स्वराज्य मला घडवायचंय… मी कटिबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी. मी बांधील असेन तो फक्त जनतेशी,’ असे नमूद केले आहे.

हे ही वाचलंत का…  

Back to top button