निर्घृण हत्या www.pudhari.news  
Latest

आईनेच प्रियकराच्या मदतीने तोंडात बोळे कोंबून घेतला पोटच्या मुलाचा जीव

दीपक दि. भांदिगरे

अंबड (जि. जालना); पुढारी वृत्तसेवा : प्रेमामध्ये आडकाठी ठरत असलेल्या आपल्या ६ वर्षाच्या मुलाचा खून आई शीतल उघडे हिने प्रियकर नवनाथ जगधने (रा. पैठण) याच्या मदतीने केल्याची घटना घडली आहे. अंबड तालुक्यातील डावरगाव येथे दि.१५ रोजी ही घटना घडली. आईनेच तोंडात बोळे कोंबून पोटच्या मुलाचा जीव घेतला आणि मुलगा हरवल्याचा खोटा बनाव करून अंबड पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

याविषयीचे सविस्तर वृत्त असे की, अंबड तालुक्यातील डावरगाव येथील शितल विनोद उघडे ही महिला तिची मोठी जाऊ आजारी असल्याने अंबड येथील डॉ. कासलीवाल यांच्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन आली होती. त्यावेळी तिच्यासोबत तिचा ६ वर्षाचा मुलगा आदित्य देखील होता.

डॉक्टरानी दिलेली औषधी आणण्यासाठी मेडिकलवर जात असताना त्या दवाखान्यात गेटवर उभ्या असलेल्या (प्रियकर नवनाथ जगधने) एका अनोळखी व्यक्तीजवळ मुलगा आदित्य यास थांबण्यास सांगितले. तसेच त्या व्यक्तीने मी कुठेही जाणार नाही, असा विश्वास देऊन स्वतःचा मोबाईल नंबर घ्या, असे म्हणून मोबाईल नंबर एका कागदावर लिहून दिला.

तसेच औषधे घेऊन आल्यानंतर तो व्यक्ती आणि मुलगा आदित्य त्या ठिकाणी आढळून आले नव्हते. यावेळी खूप शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत. असा खोटा बनाव करून फिर्यादी शीतल उघडे यांनी अंबड पोलीस ठाणे गाठून मुलगा मिळून न आल्याची तक्रार दाखल केली.

खून केल्याची कबुली

अंबड पोलिसांनी त्या मोबाईल नंबर असलेल्या संशयितास ताब्यात घेऊन मुलाचा शोध घेतला. मात्र मुलगा कुठेच आढळून न आल्याने फिर्यादी तसेच संशयितास पोलिसी खाक्या दाखवताच खून केल्याचे कबूल केले.

काल दि.१५ रोजी रात्री उशिरा अंबड शहरापासून सुमारे ५ किमी अंतरावर घनसावंगी रोडवर एका नाल्यात तोंडात बोळा घातलेल्या अवस्थेत मुलगा आढळून आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरुन चिमुरड्या आदित्यचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद

अंबड शहरात एका खासगी हॉस्पिटलमध्ये आरोपी महिला शीतल उघडे ही तिची जाऊ आजारी असल्याने उपचारासाठी आली. तसेच आपल्या लहान मुलाला औषधे आणण्यासाठी घेऊन जात असताना एका अनोळखी इसमाजवळ मुलाला देण्याचा बनाव करण्यात आला. तसेच नंतर आपल्या ६ वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद अंबड पोलिसांत दाखल करण्यात आली.

दिवसभर या चिमुकल्या मुलाचा शोध घेतला असता शहरापासून ५ किमी अंतरावर तोंडात बोळा घालून चिमुकल्याचा निर्घृणपणे खून करून फेकण्यात आलेचे फिर्यादी कडून सांगण्यात आले. तपासात आईनेच पोटच्या मुलाचा जीव घेतल्याचे उघड झाले आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT