Actor Prabhas Wedding 
Latest

Actor Prabhas Wedding : प्रभास लग्न करणार? ‘या’ व्यक्तीने दिली सर्वात मोठी हिंट

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रभासच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. 'सालार' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर तो लग्नबंधनात ( Actor Prabhas Wedding ) अडकेल, अशी माहिती समोर आलीय. याबाबत प्रभासची काकी श्यामला देवीने मोठी हिंट दिली आहे.

संबंधित बातम्या

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या 'बाहुबली' चित्रपटातील दमदार भूमिकेनंतर तेलुगू अभिनेता प्रभास लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली होती. दरम्यान त्याचे नाव साऊथ अभिनेत्री अनुष्का शेट्टी आणि 'आदिपुरुष' चित्रपटानंतर अभिनेत्री क्रिती सेनॉन हिच्याशी जोडलं गेलं होतं. तर प्रभासचा आगामी 'सलार' या चित्रपट चाहत्यांच्या भेटीस येत असून अद्याप चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. सध्या प्रभास चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. दरम्यान प्रभासची काकी श्यामला देवी यांनी नुकतेच झालेल्या एका मुलाखतीत प्रभासच्या लग्नाबाबत मोठी हिट दिली आहे.

श्यामला देवी यांनी सांगितले आहे की, 'आम्हाला दुर्गा मातेचा आशीर्वाद आहे. परमेश्वर आमच्या कुंटुबियांसह सर्वांना सुखात ठेवेल. आपल्या सर्वांची चांगली काळजी घेईल. प्रभास नक्कीच लवकरच लग्न करणार आहे हे खरं आहे. आम्ही तुम्हा सर्वांना लग्नासाठी आमंत्रित करणार आहोत. याशिवाय प्रभासचा विवाह मोठ्या थाटामाटात साजरा करणार आहोत.' असे म्हटलं आहे. यावरून प्रभास चित्रपटाच्या बिझी शेड्युलमधुन वेळ काढुन लग्न बंधनात अडकणार असल्याची समजते. मात्र, प्रभास खरोखरचं लग्न करत आहे की नाही? आणि कोणासोबत लग्न करणार आहे? याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान सोशल मीडियावर प्रभासच्या लग्नाची ( Actor Prabhas Wedding ) मात्र जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

'या' ठिकाणी प्रभासचे होणार लग्न

'आदिपुरुष' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रभासने त्याच्या लग्नाच्या लोकेशनबद्दल सांगितले होतं. यावेळी प्रभासला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला असता त्याने तिरुपतीमध्ये लग्न करणार असल्याचे सांगितले होतं. यावरून प्रभासने आधीच लग्नाचे ठिकाण ठरवल्याची माहिती मिळतेय. या त्याच्या घोषणेनंतर चाहत्यांना खूपच आनंद झाला होता. पंरतु, प्रभासने कोणासोबत लग्न करणार? यांची माहिती दिली नव्हती.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास प्रभासचा आगामी 'सालार' हा चित्रपट २२ डिसेबर २०२३ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबत बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हासन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान शाहरूख खानचा आगामी 'डंकी' चित्रपटही याच दिवशी रिलीज होणार आहे. त्यामुळे ख्रिसमसच्या मुहूर्तादरम्यान दोन्ही चित्रपट एकमेंकांना टक्कर देणार आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT