जिम ट्रेनरला थेट ‘रेंज रोव्हर’ गिफ्ट देणाऱ्या प्रभासची संपत्ती आहे तरी किती? | पुढारी

जिम ट्रेनरला थेट 'रेंज रोव्हर' गिफ्ट देणाऱ्या प्रभासची संपत्ती आहे तरी किती?

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

साऊथ सुपरस्टार प्रभासला कोण ओळखत नाही. प्रभास म्हटलं की, डोळ्यांसमोर येतो बाहुबली चित्रपट. प्रभास आज संपूर्ण जगभरात ओळखला जातो. ग्लोबल फेस असणाऱ्या प्रभासविषयी जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मग, चला प्रभासच्या वाढदिवसानिमत्त त्याच्याबद्दल या खास गोष्टी जाणून घेऊया. 

Prabhas on 'Baahubali 2: The Conclusion' third anniversary: Biggest film of  my life - News Nation English

प्रभास आज आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रभासचे खरं नाव ‘व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पालपती’ असे आहे. प्रभासचा जन्म २३ ऑक्टोबर १९७९ ला चेन्नईमध्ये झाला. त्याचे वडील, सुर्यनारायण राजू उप्पालपती हे चित्रपट निर्माते आहेत. आईचे नाव शिवकुमारी. प्रभास तीन भाऊ-बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. त्याचे काका कृष्णम राजू प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेते आहेत. त्याचे शालेय शिक्षण भीमावरमच्या डीएनआर स्कूलमध्ये झाले आणि हैदराबादच्या श्रीचैतन्य कॉलेजमधून त्याने बी.टेक.ची पदवी घेतली आहे. 

BaahubaliStar Prabhas Back With A Bang Announces Three Back-To-Back Films  Amid COVID-19 Crisis | कोरोना वायरस महामारी में कम नहीं हुआ सुपरस्टार प्रभास  का स्टारडम, बैक टू बैक तीन ...

प्रभासने टॉलिवूड ते बॉलिवूडपर्यंत असा यशस्वी प्रवास करत अमाप लोकप्रियता मिळवली. एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लुजन’या दोन चित्रपटांमुळे प्रभासला लोकप्रियता मिळाली. 

dinsta

हैदराबादमध्ये ‘जुबली हिल्स’ या वस्तीत त्याचा आलिशान बंगला असून त्याने २०१४ मध्ये चित्रपट नगरातही आणखी एक बंगला खरेदी केला आहे. बाहुबली चित्रपटासाठी त्याने २५ कोटींचे मानधन घेतले होते. प्रभास अनेक कंपन्यांचा ब्रँड ॲम्बेसेडरदेखील आहे. यासाठी त्याला मोठी रक्कम मिळते. 

Prabhas FC (@prabhas_raju23) | Twitter

कोटींचा टॅक्स   

प्रभासच्या कमाईचा अंदाज या गोष्टीमुळे केला जाऊ शकतो की, तो सर्वात अधिक टॅक्स देणाऱ्या सेलेब्सच्या यादीत आहे. जवळपास ७ कोटी रुपये आयकर भरतो, अशी माहिती आहे. 

Prabhas FC (@Rebels_FC) | Twitter

कार वेडा प्रभास 

सिंपल दिसणारा प्रभास अनेक स्टायलिश कारवेडा आहे. त्याच्याकडे अनेक लग्जरी कारचे कलेक्शन आहे. ३.८९ कोटी रुपयांच्या किमतीची रेंज रोवर, सर्वात महागडी गाडी रॉयल रॉयस फँटम आहे. या  कारची कीमत जवळपास ८ कोटी रुपये आहे. प्रभासकडे ४८ लाखांची BMW X3, दोन कोटीं रुपयांची जगुआर एक्सजे आणि 30 लाख रु. किंमतीची स्कोडा सुपर्बदेखील आहे. जवळजवळ प्रभास १९८ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. 

चक्क जिम ट्रेनरला दिली रेज रोव्हर गिफ्ट 

Baahubali actor Prabhas gifts this luxury SUV worth Rs 73 lakh to his gym  trainer - The Financial Express..

काही महिन्यांपासून जिम बंद पडले आहेत. त्यामुळे प्रभास आपल्या घरीच फिटनेसचे लक्ष ठेवतो. दरम्यान, प्रभासने आपल्या जिम ट्रेनरला ७३ लाख रुपयांची रेंज रोवर कार गिफ्ट केली होती. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. प्रभासने ट्विटर अकाउंटवर काही फोटो शेअर केले होते, यामध्ये प्रभास रेंज रोवरसोबत दिसत होता. एका फोटोत प्रभास कारच्या पुढे जिम ट्रेनर लक्ष्मण रेड्डीसोबत पोझ देताना दिसला. 

या चित्रपटातून डेब्‍यू 

प्रभासने २००२ मध्ये ‘ईश्वर’ या चित्रपटातून डेब्यू केलं होतं २००३ मध्ये तो ‘राघवेन्द्र’ या चित्रपटात दिसला. २००४ मध्ये चित्रपट ‘वर्धन’ आणि २००५ मध्ये त्याने पहिल्यांदा दिग्दर्शक एस एस राजामौलीचा चित्रपट ‘बाहुबली’मध्ये भूमिका साकारली. हा चित्रपट ५० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये १०० दिवसांपासून अधिक कालावधी चालला. प्रभासने ‘पौरनामी’, ‘योगी’ आणि ‘मुन्ना’में काम केले. 

आगामी चित्रपट 

आता प्रभास ‘राधे श्याम’ आणि ‘आदिपुरूष’मध्ये दिसणार आहे. 

Image

Image

Back to top button