NoBindiNoBusiness जुना ट्रेंड व्हायरल का होतोय? (Video) | पुढारी

NoBindiNoBusiness जुना ट्रेंड व्हायरल का होतोय? (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : नो बिंदी नो बिझनेस असा ट्रेंड ट्विटरला दिसत आहे. काही वर्षापूर्वी सुरु झालेल्या या ट्रेंडने पुन्हा वापसी केली आहे. एक्स (ट्विटरवर) वर NoBindiNoBusiness असा हॅशटॅग ट्रेंड दिसत असून शेफाली वैद्य यांचा मुलाखतीचा जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ Shefali Vaidya. या एक्स अकाऊंटवर पिन करण्यात आला आहे. २६ सप्टेंबरचा हा व्हिडिओ असून त्यांनी अनेक जाहिरातीत मॉडेल्स अथवा अभिनेत्रींच्या कपाळावरील बिंदी (टिकली) कशी गायब झालीय आणि तरीही अनेक ज्वेलरी ब्रँड्स, कंपन्या कशा जाहिराती सादर करतात, याविषयीचा आढावा घेतला आहे. त्यांनी खासकरून हिंदू धर्मातील सणांविषयी आणि त्यासंदर्भातील जाहिरातींविषयी उहापोह घेतला आहे. (NoBindiNoBusiness)

संबंधित बातम्या-

सणासुदीच्या अगदी आधी ही मोहीम पुन्हा लाँच करण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्हाला हिंदू पैसा हवा असेल तर हिंदूंच्या श्रद्धा, भावना आणि प्रतीकांचा आदर करायला शिका. मोठ्याने आणि स्पष्ट सादर करा. बिंदी नाही, तर व्यवसाय नाही. सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा! अशे शेफाली वैद्य यांनी ट्विट केले आहे.

शेफाली वैद्य व्हिडिओमध्ये काय म्हणतात पाहा-

मला हिंदू धर्माचा अभिमान आहे. काही वर्षांपूर्वी अनेक कार्पोरेट कंपन्या हिंदु धर्मातील सणांचा जसे की दिवाळी वगैरे आल्या की, जाहिरात करायच्या. त्यावेळी जाहिरातीत हिंदू सणांची प्रतिके दाखवली जायची. जसे की, रांगोळी, दिवे वगैरे. पण आता चार – पाच वर्षांपासून हळूहळू हे बदलत गेलं आहे. रांगोळी गेली, फुले गेली. बिंदी (टिकली) हे शेवटचे प्रतिक होते, तेही या जाहिरात कंपन्यांनी वगळले. केवळ जाहिरातींमध्ये अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सना घेऊन अशा जाहिराती केल्या, ज्या हिंदु सण उत्सवाच्या आधी रिलीज केल्या जायच्या . पण त्या अभिनेत्री वा मॉडेल्सच्या कपाळावर बिंदी दिसायची नाही. हिंदू प्रतिकांविना केवळ पैसे मिळवण्याच्या उद्देशाने ही जाहिरात केली जाते. म्हणून ‘नो बिंदी नो बिझनेस.’ (NoBindiNoBusiness)

यानंतर काही जाहिरातींनी फोटो, व्हिडिओ एडिट करून मॉडेल्सच्या कपालावर बिंदी दाखवली. अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्ये मग ते फेस्टिव्ह सीझनच्या असतील, मॉडेल्स अनेक वेगळे कपडे परिधान केलेल्या दाखवतात. त्यांच्या चेहऱ्यावर निराशाजनक भाव दिसतात, बिंदीदेखील दिसत नाही आणि आनंद साजरा करा असा संदेश दिला जातो. अशा जाहिराती पाहिल्यानंतर आनंद कसा मिळेल?

मागील वर्षी सोशल मीडिया पर #नोबिंदीनोबिजेनस ट्रेंड झाला होता. त्यावेळी हा ट्रेंड अनेक मोठ्या कंपन्यांच्या विरोधात सुरु झाला होता. कपडे, होम डेकोर आणि लाईफस्टाईल प्रोडक्ट्स विकणाऱ्या कंपन्यांविरोधात सुरु झाले होते. आता सण-उत्सव दरम्यान पुन्हा हा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु झालेला दिसतो.

Back to top button