#InternationalTigerDay : वाघ-मानव संघर्शात मानवी मृत्य वाढत आहेत
२०१४ मध्ये ताडोबा, प्रादेशिक आणि इतर जंगलात वाघ आणि इतर हिंस्र प्राण्यांच्या हमल्यात ९ लोकांचा मृत्यू झाला होता. २०१५ मध्ये ८ ,२०१६ मध्ये १७ ,२०१७ मध्ये १७ ,२०१८ मध्ये २७ ,२०१९ मध्ये २५ ,२०२० मध्ये ३३ आणि २०२१ मध्ये आतापर्यंत ३१ लोकांचा वण्यजीवांमुळे मृत्यू झाला आहे.
२०१४ ते २०२१ दरम्यान १६७ लोक मृत्युमुखी पडले असून ह्यात वाघांमुळे १२२ तर इतर प्राण्यांमुळे ४५ गावकऱ्याचा मृत्यू झालां आहे. वयाघ्र प्रकल्पात ३५ आणि प्रादेशिक मध्ये १३२ लोकांचा मृत्यू झाला होता. हा आलेख पाहता दर वर्षी मानवी मृत्यूत वाढ होताना दिसत आहेत. ह्या वर्षीचे वैशिष्ट म्हणजे उन्हाळ्यात होणारा हा संघर्ष आता जून-जुलै महिन्यात सुधा घडतो आहे. ह्यात मृत्युमुखी पडनाऱ्यात गुराख्यांचा समावेश जास्त आहे.
#InternationalTigerDay : वाघ-मानव संघर्षात वाघांचा मृत्यू
२०१४ ते २०२१ ह्या सात वर्षात नैसर्गिक,अपघात आणि शिकार अश्या घटनात एकूण ६४ वाघांचा मृत्यू झाला असून नैसर्गिक कारणामुळे ३८ वाघ , अपघातात ११ वाघ , आणि शिकारीत १५ वाघांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनात येते.
ह्या घटना पाहता २०१९ आणि २०२० ह्या दोन वर्षात शिकारी मुळे १० वाघांचा मृत्यू झाला ही घटना ह्या संघर्षाचे वाढते स्वरूप विषद करते. हा संघर्ष कमी करण्यासाठी २६ जुलै रोजी नागपूर येथील अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक,वन्यजीव ह्यांनी जिल्ह्यातील सर्व वनाधिकारी आणि तज्ञांची वेबिणार द्वारा बैठक घेतली आणि सुचना मागविल्या.
#InternationalTigerDay : संघर्ष कमी करण्यासाठी उपाय योजना
वाढते वाघ-बिबट-अस्वल आणि वन्यजीवांची संख्या, हल्यात मानवी मृत्यू ,शेतीचे नुकसान ,जंगलतोड आणि मानवाचा जंगलातील हस्तक्षेपामुळे वाघ-मानव संघर्ष वाढतो आहे .वाघ, वन्यजीव आणि मानव ह्यांचे अस्तित्व महत्वाचे असुन त्यांच्यात सहजीवन साधता येईल काय ह्यावर चिंतन झाले पाहिजे.
यासाठी दीर्घकालीन आणि लघु कालीन उपाय योजना करणे अत्यावश्यक आहे. वन जमिनीवर आणि वाघांच्या भ्रमन मार्गात वनीकरण,गवताळ प्रदेश वाढविणे, जलसाठे तयार करणे, गावाजवळ मोह ,फळझाडे आणि तेंदू झाडांची लागवड करणे,गावे आंनी शेतीसाठी सोलार कुंपण, गावांची जंगलावरील अवलंबिता कमी करणे, ग्रामीण भागाचा विकास करणे, जंगलातील रस्त्यांना आतून वन्यजीव मार्ग देणे, वनशेतीला चालना देणे आणि वाघ-मानव संघर्षासाठी स्वतंत्र सेल स्थापण करणे इत्यादी अनेक स्थायी उपाय योजना आवश्यक आहेत.
सोबत लघु कालीन उपाय योजना जसे हल्ले करणाऱ्या आणि अगदी गावाजवळ असलेल्या वाघ,बिबट,अस्वल ह्यांना त्वरित पकडण्याची परवानगी मिळणे आणि योग्य अभयारण्यात सोडणे,लोकांना जंगलात जाण्यापासून परावृत्त करणे ,जंगलात चराईवर नियंत्रण, वन विभागाचे नियमित निरिक्षन ठेवणे ,स्थानिक नेते आनि गावकऱ्याचे संवर्धनासाठी मन वळविणे, जिल्हा परिषद आणि वन विभागातर्फे ग्रामीण भागात गरिबी दूर करणे इ अनेक विकासाच्या विविध योजना राबवविणे अश्या अनेक उपाय योजना राबविल्यास वाघ-मानव संघर्ष निश्चित कमी करता येईल अश्या उपाययोजना ताडोबा क्रीटीकल वाइल्डलाईफ हेबिटट कमिटीचे सदस्य प्रा सुरेश चोपणे ह्यांनी वन विभागाला सुचविल्या आहेत