इस्लामाबाद ; पुढारी ऑनलाईन : तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर नागरिकांवर अनेक निर्बंध घातले आहेत. आता त्याच दिशेने पाकिस्तानचीही वाटचाल सुरु झाली आहे. पाकिस्तानमध्ये शिक्षकांना जीन्स, टी शर्ट घालण्यास बंदी असेल, असा आदेश शिक्षण विभागाने दिला आहे. जीन्स, टी शर्ट घालण्यास बंदी घालण्याच्या निर्णयावर शिक्षकांसह नागरिकांकडून टीका होत आहे.
यासंदर्भात पाकिस्तानमधील डॉन दैनिकामधील रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या शिक्षण विभागाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, महिला शिक्षकांनी जीन्स आणि तंग कपड्यांचा वापर करु नये. तसेच पुरुष शिक्षकांनीही जीन्स आणि टी-शर्टचा परिधान करता येणार नाही.
या नवीन आदेशाचे पत्र शिक्षक विभागाने देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालांना पाठवले आहे. मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी आपल्या कर्मचारी वर्गाचा वेषभूषेचे नियम करावेत. यामुळे समाजात एक सकारात्मक संदेश जाईल. शिक्षकांनी जीन्स आणि टी-शर्टचा वापर करुन नये. त्याचबरोबर व्यक्तिगत स्वच्छतेसंदर्भातील सर्व नियमांचे पालन करावे, असेही या अधिसूचनेमध्ये नमूद केले आहेत.
वेषभूषेचा परिणाम व्यक्तीच्या विचारांवर होताे, असे आम्ही केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
शिक्षकांच्या वेशभूषेच्या परिणाम थेट मुलांच्या मनावरच होतो.
यामुळे यापुढे महिला व पुरुष शिक्षकांना जीन्स, टी-शर्ट घालता येणार नाही.
तसेच महिला शिक्षकांनी तंग वेषभूषा करु नये.
त्यांनी शिकवताना व प्रयोगशाळांमध्ये टीचिंग गाउन्सचा वापर करावा, तसेच कोट परिधान करावा, असेही या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान हे महिलांवरील लैंगिक अत्याचारास महिलांच्या वेषभूषेलाच दोष देत आहेत. मात्र तीन वर्षांच्या चिमुकलीवर होणारा अत्याचार हा कोणत्या वेषभूषेमुळे होता, असा सवाल येथील नागरिकांकडून होत आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यापासून नागरिकांवर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याच पद्धतीने आता पाकिस्तानमध्येही शिक्षकांच्या वेषभूषेवर मर्यादा आणून पाकिस्तानमध्येही तालिबानी राजवट आणण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका शिक्षण विभागाच्या आदेशावर हाेत आहे..
हेही वाचलं का ?
व्हिडिओ