नासाचे अॅक्सिओम मिशन ४ (Axiom-4 mission) २९ मे रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (International Space Station) दिशेने प्रक्षेपित केले जाणार आहे. नासाच्या या मोहिमेत भारत देखील नेतृत्त्व करणार आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) हे या मोहिमेत सहभागी होणार आहेत.
भारतीय हवाई दलातील पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) हे नासाचे माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन यांच्या नेतृत्वाखालील क्रू सदस्यांच्या पथकात सहभागी होतील. ते यात मिशन कमांडर म्हणून काम पाहतील. त्यांच्यासोबत पोलंडचे स्लावोस उझनान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कपू हे दोन मिशन तज्ज्ञ असतील. या मोहिमेतर्गंत पहिला इस्रो (ISRO) अंतराळवीर आंतरराष्ट्रीय स्थानकात पोहोचेल
स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानातून प्रवास करत अंतराळ स्थानकावर पोहोचेल. त्यानंतर अवकाशात रिकाम्या जागेत नवीन प्रयोग केले जातील. यामधील प्रयोगांपैकी एक नवीन असा आहे की, मधुमेही अंतराळवीरांसाठी अंतराळ प्रवास कायमचा बदलू शकतो.
अनेक दशकांपासून, मधुमेह असलेल्या लोकांना असे सांगितले जात होते की, ते अंतराळवीर बनू शकत नाहीत. कारण अंतराळात रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्याचा धोका खूप जास्त असतो. पण नासाच्या (NASA) अॅक्सिओम मिशन ४ (Axiom-4 mission) मधील अंतराळवीर शून्य गुरुत्वाकर्षणावर 'सुट राइड' ची चाचणी करतील. ही चाचणी यशस्वी झाल्यास मधुमेही अंतराळवीरांना देखील अंतराळात जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.
'सुट राईड' हा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (ISS) अॅक्सिओम मिशन ४ मधील (अॅक्स-४) संशोधन प्रकल्प आहे. मधुमेह असलेल्या आणि इन्सुलिन घेत असणाऱ्या लोकांना अंतराळात राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी सुरक्षित मार्ग शोधणे हे या संशोधनाचे ध्येय आहे, असेही सांगण्यात येत आहे.
रक्तातील साखरेचे अचूक निरीक्षण: अवकाशात रक्तातील साखरेची पातळी विश्वसनीयरित्या मोजता येईल याची खात्री करणे.
ऑर्बिटमध्ये डेटा संकलन: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (ISS) अंतराळवीरांकडून रिअल-टाइम रक्तातील साखरेचा डेटा गोळा करणे.
जमिनीचे विश्लेषण: डेटा पृथ्वीवर परत पाठवणे जेणेकरून डॉक्टर त्याचा अभ्यास करू शकतील आणि सुरक्षितता सुनिश्चित करू शकतील.
हे टप्पे पूर्ण करून, 'सुट राईड'चा उद्देश अंतराळात मधुमेहाचे व्यवस्थापन शक्य आहे हे सिद्ध करणे आहे, ज्यामुळे भविष्यातील अंतराळवीर बनू इच्छिणाऱ्या मधुमेही उमेदवारांसाठी दरवाजे उघडले जातील.
भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे अॅक्स-४ क्रूचे एक प्रमुख सदस्य आहेत. ते या मोहिमेंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जीवशास्त्राचे प्रयोग करणार आहेत. त्यापैकी 'सुट राईड' हा एक जीवशास्त्राचा भाग असू शकतो, असेही स्पष्ट करण्यात येत आहे.