कोण आहेत शुभांशू शुक्ला? जे 'इंटरनॅशनल स्पेस स्टेशन'कडे प्रवास करुन इतिहास रचणार

शुभांशू शुक्ला यांची Axiom-4 mission साठी पायलट म्हणून निवड
Axiom-4 mission, Shubhanshu Shukla
शुभांशू शुक्ला. (source- Axiom space)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय हवाई दलातील पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांची अ‍ॅक्सिओम मिशन ४ (Axiom-4 mission) साठी पायलट म्हणून निवड झाली आहे. ते लवकरच स्पेसएक्स ड्रॅगन स्पेसक्राफ्ट घेऊन आंतरराष्ट्रीय स्थानकाकडे रवाना होतील. यामुळे ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (International Space Station) प्रवास करणारे पहिले भारतीय ठरतील.

शुक्ला हे नासाचे माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन यांच्या नेतृत्वाखालील क्रू सदस्यांच्या पथकात सहभागी होतील. ते यात मिशन कमांडर म्हणून काम पाहतील. त्यांच्यासोबत पोलंडचे स्लावोस उझनान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कपू हे दोन मिशन तज्ज्ञ असतील. या मोहिमेतर्गंत पहिला इस्रो (ISRO) अंतराळवीर आंतरराष्ट्रीय स्थानकात पोहोचेल. तसेच पोलंड आणि हंगेरीतील अंतराळवीरांचा स्थानकावर हा पहिला मुक्कामदेखील असेल.

या मोहिमेबद्दल एक वेगळाच उत्साह असल्याचे सांगत शुक्ला म्हणाले की, त्यांना भारतातील लोकांसोबत त्यांना येणारा अनुभव शेअर करण्याची खूप उत्सुकता लागली आहे. देशाच्या विविध भागातील संस्कृतीशी संबंधित वस्तू अंतराळात घेऊन जाण्याची त्यांची योजना आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्थानकात योगासने करण्याचाही त्यांची इच्छा आहे. "अंतराळात मी एकटा प्रवास करणार असलो तरी हा १.४ अब्ज लोकांचा प्रवास आहे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ही मोहीम १४ दिवसांची आहे. यादरम्यान क्रू सदस्य वैज्ञानिक प्रयोग, आउटरीच कार्यक्रम आणि सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात व्यावसायिक उपक्रमही करतील.

Ax-4 मोहिमेबद्दल...

Ax-4 ही मोहीम म्हणजे खासगी अंतराळवीरांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पोहोचवण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग असेल. नासाच्या ISS कार्यक्रमाच्या व्यवस्थापिका डाना वेइगेल यांच्या मते, अ‍ॅक्स-४ सारख्या खासगी मोहिमा शाश्वत पृथ्वीच्या खालच्या कक्षेतील अर्थव्यवस्थेचा मार्ग मोकळा करण्यास मदत करतात. ज्यामुळे भविष्यात सखोल अंतराळ संशोधन शक्य होते.

कोण आहेत शुभांशू शुक्ला?

शुभांशू शुक्ला यांचा जन्म १० ऑक्टोबर १९८५ रोजी लखनौमध्ये झाला. ते जून २००६ मध्ये भारतीय हवाई दलात (IAF) लढाऊ पायलट म्हणून रुजू झाले. त्यांना मार्च २०२४ मध्ये ग्रुप कॅप्टन म्हणून रँक मिळाली. Su-30MKI, MiG-21, MiG-29, Jaguar, Hawk, Dornier आणि An-32 यासह विविध सुमारे २ हजार विमान उड्डाणांचा त्यांच्याकडे अनुभव आहे. २०१९ मध्ये त्यांनी रशियातील युरी गागारिन कॉसमोनॉट प्रशिक्षण केंद्रात पदवीपूर्व अंतराळवीर प्रशिक्षण घेतले. देशाची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहिम 'गगनयान' साठी त्यांची इस्रोने निवड केली आहे. ते आता नासा-अ‍ॅक्सिओम यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे प्रवास करणारे इस्रोचे पहिले अंतराळवीर ठरतील.

Axiom-4 mission, Shubhanshu Shukla
Budget Session 2025 | 'माँ लक्ष्मीची देशातील गरीब- मध्यमवर्गीयांवर विशेष कृपा राहो'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news