नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Indian Railways : वर्ष २०१६ नंतर आतापर्यंत रेल्वेकडून ८०० हून अधिक नवीन रेल्वेगाड्या चालवण्यात आल्याची माहिती रेल्वे बोर्डाकडून देण्यात आली आहे. २०२०-२१ मध्ये कोरोना महारोगराईमुळे कुठलीही नवीन रेल्वेगाडी चालवण्यात आली नाही. महारोगराईमुळे सामान्य सेवांना देखील स्थगित करण्यात आले होते. पंरतु, रेल्वेने वर्ष २०१९-२० मध्ये १४४, २०१८-१९ मध्ये २६६, २०१७-१८ मध्ये १७० आणि २०१६-१७ मध्ये २२३ नवीन रेल्वेगाड्या चे परिचालन सुरू केले. मध्यप्रदेश मधील निवासी चंद्रशेखर गौड यांच्या माहिती अधिकाराच्या अर्जावर रेल्वे बोर्डाकडून ही माहिती सादर करण्यात आली आहे.
पुर्वी नवीन रेल्वेगाडीच्या घोषणेसंबंधी रेल्वे अर्थसंकल्पाची प्रतिक्षा केली जात होती.विशेषत: केंद्रात सत्तेवर असलेल्या पक्षाची ज्या राज्यात सरकार आहे त्या राज्यांमध्ये रेल्वे अर्थसंकल्पाची आतुरतेने प्रतिक्षा केली जात असायची. रेल्वे अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनूसार राजकीय कारणांमुळे नेहमी नवीन रेल्वे गाड्यांची घोषणा केली जायची.पंरतु,आता तार्किकतेने निर्णय घेतला जात असून रेल्वेगाडीची आवश्यकता असल्यावरच नवीन रेल्वेची घोषणा केली जाते.
दरम्यान रेल्वेने लखननऊ-एलटीटी सह अनेक ट्रेनचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनूसार सणासुदीमुळे मुंबई, पुणे करीता चालणाऱ्या काही विशेष ट्रेनमध्ये प्रवाशांची मोठी प्रतिक्षा यादी दिसून येत आहे. या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
०१४०७- पुणे-लखनऊ जंक्शन स्पेशल ट्रेन २९ मार्च पर्यंत
०१४०८- लखनऊ जंक्शन-पुणे स्पेशल ट्रेन ३१ मार्च पर्यंत
०२१०७- एलटीटी लखनऊ जंक्शन सुपरफास्ट स्पेशल ट्रेन ३० मार्च पर्यंत
०२११०८- लखनऊ जंक्शन-एलटीटी सुपरफास्ट स्पेशल ३१ मार्च पर्यंत
०२०९९- पुणे-लखनऊ जंक्शन स्पेशल ट्रेन २९ मार्च पर्यंत
०२१००- लखनऊ जंक्शन-पुणे स्पेशल ट्रेन ३० मार्च पर्यंत
०१०७९- एलटीटी-गोरखपुर स्पेशल ट्रेन ३१ मार्च पर्यंत
०१०८०- गोरखपुर-एलटीटी स्पेशल ट्रेन २ एप्रिल, २०२२ पर्यंत