फी न भरल्‍यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढले | पुढारी

फी न भरल्‍यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढले

शाळेची फी न भरल्यामुळे पहिल्या दिवशी शाळेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्‍यात आल्‍याचा प्रकार पुण्यातील सिंहगड रोड वरील ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडल. त्यामुळे शाळेबाहेर पालकवर्ग आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

कोरोनामुळे बहुतांश जणांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे अनेकांना शाळेच्या फी भरता आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत शाळांकडून गेल्या अनेक दिवसांपासून फी भरण्याची सातत्याने मागणी होत आहे. मात्र, हातालाच काम नसल्यामुळे फी भरणार तरी कुठून? असा प्रश्न पालकांसमोर उभा आहे.

अशातच सोमवारपासून शासनाच्या आदेशानुसार, शाळा सुरू झाल्या आहेत.

शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच फी न भरल्यामुळे सिंहगड रस्त्यावरील ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेबाहेर उभे केले.

त्यामुळे पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.

काही विद्यार्थी तर अक्षरश: शाळेत घेत नसल्यामुळे पुन्हा घरी परतले.

त्यानंतर पालकांनी शाळेसमोर जमून शाळेविरोधात निदर्शन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांना या ठिकाणी येऊन मध्यस्थी करावी लागली.

शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना वर्गात घेतले मात्र, तोपर्यंत काही विद्यार्थी घरी परतले होते.

कोरोनाच्या आर्थिक स्थितीत अशा प्रकारची सक्ती करणे हे योग्य आहे का? असा सवाल यावेळी पालकांकडून उपस्थित करण्यात आला.

हेही वाचलंत का?

शाळेची फी भरण्यासाठी सवलत

गेल्या वर्षीची फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना ठेवलं बाहेर, यंदाच्या वर्षाची फी आम्ही मागत नाही, इथून पुढे विद्यार्थ्यांना अडवणार नाही, फी भरण्यासाठी पालकांना सवलत देण्यात येईल. त्यानुसार पालकांनी फी भरावी.
– रेणुका दत्ता, (प्राचार्य, ज्ञानगंगा इंग्लिश मिडीयम स्कूल, सिहगड रोड, पुणे)

Back to top button