अश्विन नाईक ( संग्रहित छायाचित्र ) 
Latest

महाराष्ट्रातही भर कोर्टात ‘या’ गँगस्टर्सवर झाला होता गोळीबार

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीच्या रोहिणी कोर्टात गोळीबार करून एका गॅगस्टरची हत्या झाल्यानंतर आता मुबंईतील दोन गॅंगस्टरवरील ह्ल्ल्याची चर्चा सुरू आहे . रोहिणी कोर्टात ३५ ते ४० राऊंड फायर केले. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला.

गॅगस्टरवर गोळीबार ही घटना देशभर गाजली. सोशल मीडियामुळे ते अजूनही गाजत आहे.

मात्र, ९० च्या दशकात मुंबई अंडरवर्ल्डच्या गँगवॉरमध्ये गवळी गँगने अश्विन नाईकवर कोर्टाच्या आवारात गोळीबार केला होता.

तसेच आणखी काही घटनांमध्ये भर कोर्टांत गोळीबार केला होता.

अश्विन नाईक हा अमर नाईक या गॅगस्टरचा सख्खा भाऊ. अश्विन हा परदेशातून शिकून आला होता.

अमर लोअर परळ भागात रावण गँग चालवत होता.

परळच्या बाजूला असलेल्या भायखळ्यात अरुण गवळी आपले वर्चस्व टिकवून होता.

या दोन्ही भागात खंडण्या वसूल करण्यावरून दोघांत वर्चस्ववाद होता.

अश्विन हा परदेशातून आल्यानंतर अमरच्या टोळीत सहभागी झाला.

उच्चशिक्षित असलेला अश्विन हा टोळीचा ब्रेन होता.

एका प्रकरणात मंबईच्या काळाघोडा सेशन्स कोर्टात १९९४ मध्ये अश्विनला आणले जाणार होते.

त्यावेळी कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर एकजण वकिलाच्या वेशात आला. त्याच्या हातात एक जाडजूड पुस्तक होते.

त्यात त्याने पिस्तूल लपविली होती. त्यातून त्याने त्याच्यावर गोळीबार केला. यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती.

तसेच कंबरेत गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला.

अश्विनवर गोळ्या झाडणारा गुंड हा अरुण गवळीच्या टोळीत नवखा होता. रवींद्र सावंत असे त्याचे नाव होते.

त्याची ती पहिलीच सुपारी होती. सदामामा पावलेने ही सुपारी दिली होती. तसेच त्यासाठी कोर्टाची रेकीही केली होती.

दाऊदने भरकोर्टात केली होती हत्या

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने आपल्या भावाच्या खूनाचा बदला चमत्कारिकरित्या घेतला होता.

अमीरजादा आणि आलमजेब या दोघांनी दाऊद इब्राहीमचा भाऊ साबीर कासकरची हत्या केली होती.

या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू होती.

कोर्टात वकील आणि आरोपींचे नातेवाईक मोठ्या संख्येने उभे होते. त्यावेळीच एक व्यक्ती ग्रील नसलेल्या खिडकीत येऊन उभी राहिली.

त्या व्यक्तीने अमीरजादावर चार राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी थेट त्याच्या तोंडात लागली आणि तीन गोळ्या पोटात लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी डेव्हिड परदेशी या गुंडाला अटक केली.

काय घडले रोहिणी कोर्टात

राजधानी दिल्लीतील रोहिणी सेशन्स कोर्टात सर्व कुख्यात गुंडांना सुनावणीसाठी आणले जाते.

तुलनेने कमी सुरक्षा व्यवस्था असलेल्या कोर्टात हे कांड घडले.

गोगी आणि टिल्लू या दोन गॅगस्टरमधील हा वाद होता. हे दोघेही जिवलग मित्र होते. मात्र, पुढे ते शत्रू झाले आणि त्यांच्या वैरात २५ हून अधिक गुंड ठार झाले आहेत.

टिल्लू हा ताजपुरीयाचा रहिवासी आहे. तर जितेंद्र गोगी हा अलीपूरमधील होता. दोघांची मैत्री तुटल्यानंतर दोघे एकमेकांचे वैरी झाले. कोर्टात गोळीबार करून गॅगवाॉरने आणखी दहशत माजवली आहे.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT