bipasha basu  
Latest

HBD Bipasha Basu : करण सिंह ग्रोवरपेक्षा श्रीमंत आहे बिपाशा, इतक्या कोटींच्या संपत्तीची मालकीण

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडची हॉट अभिनेत्री बिपाशा बसू नेहमीचं चर्चेत राहते. (HBD Bipasha Basu) सध्या ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. नेहमी बिपाशा आपल्या बेबी गर्लसोबत फोटोज आणि व्हिडिओज शेअर करते. फॅन्सदेखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स देतात. बिपाशा आपल्या परिवारासोबत सर्वाधिक वेळ घालवते. सर्व अपडेस्ट आपल्या फॅन्ससोबत शेअर करते. बिपाशा बासुचा आज ७ जानेवारी रोजी ४४ वा वाढदिवस आहे. (HBD Bipasha Basu)

करणपेक्षी श्रीमंत आहे बिपाशा

बिपाशाचा जन्म ७ जानेवारी, १९७९ रोजी नवी दिल्लीमध्ये झाला होता. बिपाशा शेवटी २०१५ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'अलोन'मध्ये दिसली होती. सध्या बिपाशा चित्रपटांपासून दूर आहे. परंतु, ती आलीशान आयुष्य जगते. लाईफस्टाईलमध्ये तिचा हात कुणी धरू शकत नाही. बिपाशाची संपत्ती तिचा पती आणि अभिनेता करण सिंह ग्रोवरपक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. रिपोर्ट्सनुसार, बिपाशा बसू करणपेक्षा श्रीमंत आहे. बिपाशाची संपत्ती १५ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास १११ कोटी रुपये आहे. तिचा पती करण सिंह ग्रोवरची संपत्ती १५ कोटी रुपये आहे.

बिपाशाची कमाई

बिपाशा अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांच्या जाहिरातीतून मोठी कमाई करते. बिपाशा रीबॉक, एरिस्ट्रोकेट लगेज, फा डियोड्रेंट, गिली ज्वेलरी, कॅडिला शुगर फ्री गोल्ड, हेड अँड शोल्डर शॅम्पूसह अनेक कंपन्यांच्या जाहिरात केल्या आहेत. या कंपन्यांच्या जाहिरातींमधून मोठी रक्कम कमवते. इतकचं नाही तर वयाच्या १७ व्या वर्षी मॉडलिंग करिअर सुरुवात केली होती. बिपाशाने अनेक स्टेज शोदेखील केले आहेत. एका शोसाठी ती दोन कोटी रुपये घेते. त्याचसोबत ती ४० हून अधिक मासिक कव्हरवर झळकली आहे. ती एका चित्रपटासाठी दोन ते तीन कोटी रुपये मानधन घेते.

कार कलेक्शन आणि आलिशान घर

बिपाशाकडे लक्झरी कार कलेक्शन आहे. तिच्याकडे पॉर्श कायेन आहे, त्याची किंमत कोटींच्या घरात आहे. त्याशिवाय, तिच्याकडे ऑडी,basu  वॉक्सवॅगन बीटल यासारख्या लक्झरी गाड्या आहेत. बिपाशाकडे मुंबईतील पॉश भागात दोन घरे आहेत, त्याची किंमत कोटींमध्ये आहे. तिचे कोलकातामध्ये एक घर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT