नगर : बालिकाश्रम परिसरात पाणीपुरवठा विस्कळित | पुढारी

नगर : बालिकाश्रम परिसरात पाणीपुरवठा विस्कळित

नगर : पुढारी वृत्तसेवा :  प्रभाग आठमधील सावेडीगाव ते बालिकाश्रम रोड परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात पाण्याचे वॉल मोठ्या प्रमाणात लिकेज आहे. त्यामुळे परिसरामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई बोरूडे यांनी केली. आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, सावेडीगाव ते बालिकाश्रम रोडवरील पाईप लाईनच्या वॉल मोठ्या प्रमाणात लिकेज आहेत.

वॉलवाटे पाण्याची गळती सुरू असल्याने परिसरात कमी दाबाने पाणी येते. अनेक भागात पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. तसेच, खंडोबा मंदिर भागात पाणीपुरवठा करणारे नवीन पाईपलाईल टाकणे बाकी आहे. याबाबत संबंधितांना आदेश देण्यात यावे. याचबरोबर बालिकाश्रम रोड परिसराचा विस्कळित झालेला पाणीपुरवठा सुरळीत करावा. ठिक-ठिकाणी असणारे लिकेज तातडीने दुरुस्त करावे अन्यथा परिसरातील नागरिकांसमवेत महापालिकेत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.

Back to top button