पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या देशातील खवय्यांमध्येही 'पिझ्झा' खाण्याची क्रेझ वेगाने वाढत आहे. आज ६ डिसेंबर. 'पिझ्झा डे' ( Pizza day ) साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्च इंजग गूगलनेही 'गुगल डुडल'तर्फेही अनोख्या पद्धतीने 'पिझ्झा डे' ( Pizza day ) साजरा करण्यात येत आहे.
गुगलने पिझ्झावर खास 'डुडल' बनवले आहे. यावर क्लिक केले की, एक व्हिडिओ प्ले होत आहे. पिझ्झा कटिंग गेमच्या माध्यमातून प्रसिद्ध असणार्या पिझ्झाची यादीत देण्यात आली आहे तुम्हाला हा पिझ्झा 'व्हर्चुअल' कापायचा आहे. ६ डिसेंबर २००७ रोजी युनेस्कोच्या प्रतिनिधी सूचीत नोपिलीटन पिझ्झाइउलो तयार करण्याच्या पद्धतीचा समावेश करण्यात आला होता.
आज जगभरात फिझ्झा चवीने खाल्ला जातो. जगातील टेस्टी डिशमध्येही या खाद्यपदार्थाचा समावेश होतो. तुम्हाला माहित आहे का?, आज जगभर बोलबाला असणारा पिझ्झा नेमका काेणत्या देशातून आला. पिझ्झा ही पाककृती सर्वप्रथम इटलीमध्ये तयार करण्यात आली. सर्वात पहिला पिझ्झा हा ब्रेड, खजूर, तेल आणि भाज्या एकत्रीत करुन मातीच्या ओव्हनमध्ये तयार करण्यात आला होता. १८ व्या शतकामध्ये हा सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थ झाला. त्या काळात मोठ्या शहरांमध्ये राहणार्या लोकांसाठी पिझ्झा हा एक स्वस्त आणि जलद तयार होणारा रुचकर असा खाद्यपदार्थ होता. त्यामुळेच तो अन्य देशांमध्येही अल्पावधीत कमालीचा लोकप्रिय झाला.
असेही मानले जाते की, १८ व्या शतकांमध्ये राजा अम्बर्टो पहिला आणि रानी मार्गरिटा हे इटलीच्या दौर्यावर होते. त्यांनी राफेल एस्पोसिटो नावाचा एक पिझ्झा विक्रेत्याला बोलवले. त्याने रानी मार्गरिटका यांच्यासाठी विशेष पिझ्झा बनवला. यामध्ये टोमॅटो, चीज आणि स्वादासाठी क्रिमचा वापर केला. रानी मार्गरिटा यांना हा पिझ्झा एवढा आवडला की, एस्पोसिटो याने पुढे या पाककृतीला मार्गरिटा पिझ्झा असे नावच दिलं.
इराक आणि रोमानियानंतर पिझ्झा हा स्पेन, इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिकेत कमालीचा प्रसिद्ध झाला. अमेरिकेत तर दुसर्या महायुद्धात पिझ्झा हा सर्वाधिक खाल्ला गेलेला पदार्थ ठरला हाेता. त्याच काळात पिझ्झाचा समावेश फास्ट फूडमध्ये झाला.
हेही वाचलं का?